विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चांगल्या परिणामासाठी कोव्हिशिल्ड या भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे इतके वाढवावे, अशी शिफारस केंद्र सरकारच्या सल्लागार तज्ज्ञ गटाने केली असून ती सरकारने स्वीकारली आहे.Now take second dose after 16 weak
सध्या ४ ते ६ आठवड्याच्या अंतराने ही लस टोचली जाते. कोव्हॅक्सिनबाबत मात्र कोणताही बदल सुचविण्यात आलेला नाही. नॅशनल टेक्निकल अँडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनाइजेशनने दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस करताना यासंदर्भात ब्रिटनसह अनेक प्रगत देशांचे उदाहरण दिले आहे.
ब्रिटनमधील आरोग्य नियामक संस्थेने कोव्हिशिल्ड लसीला मान्यता दिली, तेव्हा त्यांनी दोन डोसमधील अंतर किमान तीन महिने ठेवावे असे सांगितले होते. दोन डोसमध्ये इतके अंतर असेल
तर परिणामकारकता ८० टक्क्यांनी वाढते, असेही ब्रिटनमधील तज्ज्ञांनी सांगितले होते. त्यानंतर तेथे दोन डोसदरम्यान १२ आठवड्यांचे अंतर निश्चित केले, असे या गटाने आपल्या शिफारशींमध्ये नमूद केले आहे.
Now take second dose after 16 weak
महत्त्वाच्या बातम्या
- लस, ऑक्सिजनप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले गायब, राहुल गांधी यांची टीका
- आठवडाभरात रशियाची स्पुटनिक लस भारतीयांना मिळणारल लसीकरणाला येणार वेग
- ठाकरे- पवार सरकार झोपलेलेच; तिकडे मराठा आरक्षणाबाबत केंद्राची फेरविचार याचिका! राज्यांचा अधिकार अबाधित असल्याचे प्रतिपादन
- लक्षद्वीपजवळ चक्रीवादळ घोंगावतेय ; कोंकण किनारपट्टीवर तशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार ; जोरदार पावसाची शक्यता