• Download App
    आता खऱ्या गरजुंनाच मिळणार पंतप्रधान आवास योजनेचा लाभ, नियमांमध्ये केला बदल|Now only the real needy will get the benefit of the Prime Minister's Housing Scheme, the change in the rules

    आता खऱ्या गरजुंनाच मिळणार पंतप्रधान आवास योजनेचा लाभ, नियमांमध्ये केला बदल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान आवास योजनेचा लाभ आता खऱ्या अर्थाने गरजुंना मिळणार आहे. त्यासाठी ‘पंतप्रधान आवास योजने’च्या नियमांमध्ये सरकारकडून मोठे बदल करण्यात आले आहे. बदललेल्या नियमानुसार, या योजनेंतर्गत घराचा लाभ मिळाला असेल तर पाच वर्षांसाठी लाभार्थ्यांनी या घरांत राहणं बंधनकारक करण्यात आलंय.Now only the real needy will get the benefit of the Prime Minister’s Housing Scheme, the change in the rules

    अन्यथा घर वाटप रद्द केलं जाऊ शकते.सध्या ज्या निवासस्थानांचं ‘रजिस्टर्ड अ‍ॅग्रीमेंट टू लीज’ करून दिले जात आहे किंवा जे लोक हे अ‍ॅग्रीमेंट भविष्यात करतील त्यांना ‘रजिस्ट्रेशन’ मानले जाणार नाही. या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांनी संबंधित निवासस्थानांचा वापर केला किंवा नाही, हे जाणून घेण्यासाठी सरकारनं पाच वर्षांची सीमा निश्चित केली आहे.



    लाभार्थी संबंधित निवासस्थानी पाच वर्ष राहत असेल तरच हा करार ‘लीज डीड’मध्ये रुपांतरीत केला जाईल. अन्यथा विकास प्राधिकरणाकडून लाभार्थ्यांसोबत करण्यात आलेला करार रद्दबादल ठरवण्यात येईल. त्यानंतर जमा केलेले पैसेही परत मिळणार नाहीत. या नव्या नियमांमुळे पंतप्रधान आवास योजनेचा गैरवापर बंद होईल, अशी आशा सरकारला आहे.

    सुधारित नियम आणि अटींनुसार, शहरी भागांत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बनवण्यात आलेले फ्लॅट ‘फ्री होल्ड’ होणार नाहीत. पाच वषार्नंतरही नागरिकांना इथे ‘लीज’वरच (भाडेतत्त्वावर) राहावं लागणार आहे.

    यामुळे पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊन घर मिळवून ते भाड्यानं देणाऱ्यांना चाप बसणार आहे.पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यालाच ही लीज हस्तांतरीत केली जाईल. इतर कोणत्याही कुटुंबासोबत केडीए कोणताही करार करणार नाही.

    या करारांतर्गत लाभार्थ्यांना पाच वर्षांपर्यंत या निवासस्थानांचा वापर करावा लागेल. त्यानंतर निवासस्थानं ‘लीज’ पद्धतीवर दिले जातील. याच नियमांनुसार, संपूर्ण देशात लाभार्थ्यांना मिळण्याची सुविधा दिली जाईल.

    Now only the real needy will get the benefit of the Prime Minister’s Housing Scheme, the change in the rules

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली