विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने वाहन उत्पादकांना कारमधील सर्व प्रवाशांसाठी ‘थ्री-पॉइंट’ सीट बेल्ट देणे बंधनकारक केले आहे. ज्यामध्ये मागील सीटच्या मध्यभागी बसलेल्या प्रवाशाला देखील सीट बेल्ट आवश्यक असणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.Now Nitin Gadkari’s information that three point seat belts are mandatory for all passengers in the car
गडकरी म्हणाले की, गाडीच्या मागच्या सीटवर मधल्या भागात बसलेल्या प्रवाशालाही ही व्यवस्था लागू असेल. त्यानुसार कार उत्पादकांना वाहनात बसलेल्या सर्व प्रवाशांना थ्री-पॉइंट सीट बेल्ट देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
देशभरात दरवर्षी सुमारे पाच लाख अपघातांमध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षा मानकांची अंमलबजावणी करण्यासाठी कार उत्पादकांचे आवश्यक नियम लागू करण्यात आले आहेत. थ्री-पॉइंट सीट बेल्ट लॅप बेल्टपेक्षा सुरक्षित मानले जातात.
ते प्रवाशांना विशेषत: कोणत्याही अपघाताच्या वेळी अधिक सुरक्षा प्रदान करतात. अलीकडेच, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक मसुदा मंजूर केला आहे, ज्यामध्ये कार उत्पादकांनी 8 प्रवासी बसू शकतील अशा वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग्ज देणे आवश्यक आहे.
वाहनांमधील इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, अडव्हान्स इमरजेंसी ब्रेकिंग सिस्टिम, वाहन चालकास झोप लागल्यास अलर्ट सिस्टिम, लेन ड्रायव्हिंग वॉर्निंग सिस्टिम आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या दिशेनेही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
Now Nitin Gadkari’s information that three point seat belts are mandatory for all passengers in the car
महत्त्वाच्या बातम्या
- सर्व गरीब, पीडित, वंचितांपर्यंत सरकारी योजनांचे 100% लाभ पोचवणे हाच खरा सेक्युलॅरिझम ;मोदी
- 1034 कोटींचा घोटाळा : म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी प्रवीण राऊतांचे संगनमत; ईडीचा दावा, लवकरच बडा नेताही जाळ्यात!
- Hijab Controversy : कर्नाटक हायकोर्ट म्हणाले- प्रकरण निकाली निघेपर्यंत शाळेत हिजाब किंवा भगवा स्कार्फ घालू नका!
- UP Election 2022 : यूपीमध्ये पहिल्या टप्प्यात ५७ टक्क्यांहून अधिक मतदान, ५८ जागांवर ६२३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद