• Download App
    आता गाडीच्या क्रमांकासाठी एमएच बरोबर बीएचचाही पर्याय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची भारत सिरीजची अधिसूचना|Now MH along with BH option for vehicle number, Ministry of Road Transport and Highways notification of India series

    आता गाडीच्या क्रमांकासाठी एमएच बरोबर बीएचचाही पर्याय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची भारत सिरीजची अधिसूचना

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आता गाडीच्या क्रमांकासाठी एमएचसारख्या राज्याच्या सिरीजबरोबरच बीए या देशाच्या सिरीजचाही पर्याय उपलब्ध होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी केली आहे.Now MH along with BH option for vehicle number, Ministry of Road Transport and Highways notification of India series

    आता वाहनधारक बीएच सीरिजमध्ये आपली नवीन वाहने नोंदवू शकतील. या सिरीजचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नोकरीच्या संदर्भात इतर कोणत्याही राज्यात जाताना, या क्रमांकाच्या वाहन धारकांना नवीन नोंदणी क्रमांक घेण्याची गरज भासणार नाही. या व्यवस्थेअंतर्गत, बीएच सिरीज असलेली वाहने जुन्या नोंदणी क्रमांकावरूनच आपले वाहन दुसºया राज्यात सहज चालवू शकतील.

    एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेहमी जावे लागते, अशा लोकांसाठी सरकारने विशेष नोंदणी व्यवस्था करण्याची योजना बनवली आहे, जेणेकरून त्यांना प्रत्येक राज्यात नोंदणी करून घेण्याच्या त्रासापासून सुटका मिळेल. नवीन वाहनांसाठी ही नवीन नोंदणी प्रणाली आहे.



    रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारत सीरिज या नवीन वाहनांसाठी नवीन नोंदणी चिन्ह सादर केले. वास्तविक काही वाहनांना नोंदणीच्या वेळी भारत सीरिज म्हणजेच बीएच सीरिजचा टॅग दिला जातो आणि त्यांची नोंदणी इतर वाहनांपेक्षा वेगळी असते. ज्या वाहनांना बीएच मार्क मिळेल, त्या वाहनांना एकवेळ नोंदणी आवश्यक असते.

    ही योजना स्वेच्छिक आधारावर सुरू केला जात आहे. प्रथम याचा लाभ फक्त संरक्षण, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्र आणि राज्य सार्वजनिक उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. तसेच ज्या खासगी कंपन्यांचे 4 किंवा चारपेक्षा जास्त राज्यांत कार्यालये आहेत, त्यांनाही ही विशेष सुविधा दिली जाणार आहे. यासह बीएफ मार्क असलेल्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकाचे स्वरूपदेखील इतर वाहनांपेक्षा वेगळे असेल.

    सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने आपले वाहन एका राज्यातून दुसºया राज्यात नेले, तर त्याला एक वर्षाच्या आत आपल्या वाहनाची पुन्हा नोंदणी करावी लागेल. पण आता असे लोक भारत सीरिजमध्ये आपले वाहन नोंदणीकृत करू शकतील.

    Now MH along with BH option for vehicle number, Ministry of Road Transport and Highways notification of India series

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य