• Download App
    आता भारतीय रेल्वेही धावणार हायड्रोजन इंधनावर, असे करणारा भारत बनणार तिसरा देश Now Indian Railways will run on hydrogen fuel, making India the third country to do so

    Hydrogen Fuel : आता भारतीय रेल्वेही धावणार हायड्रोजन इंधनावर, असे करणारा भारत बनणार तिसरा देश

    रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जर्मनी आणि पोलंडनंतर भारत हा हरित ऊर्जेचा वापर सुरू करणारा जगातील तिसरा देश असेल.  Now Indian Railways will run on hydrogen fuel, making India the third country to do so


    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : भारतीय रेल्वे ही हायड्रोजन इंधन (ग्रीन इंधन) वर चालवण्याची तयारी करत आहे.नवीन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा हा ऐतिहासिक उपक्रम शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.

    रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जर्मनी आणि पोलंडनंतर भारत हा हरित ऊर्जेचा वापर सुरू करणारा जगातील तिसरा देश असेल.

    अधिकाऱ्याने सांगितले की, दोन लोकल गाड्यांमध्ये (डीईएमयू) हायड्रोजन इंधन सेल बसवण्यात येतील.  नंतर नॅरो गेज इंजिनला हायड्रोजन इंधन सेल सिस्टीममध्ये रूपांतरित केले जातील.

    भारतीय रेल्वेने राष्ट्रीय हायड्रोजन एनर्जी मिशन अंतर्गत हरियाणातील सोनीपत-जींदच्या 89 किमी विभागात चालणाऱ्या डेमू ट्रेनमध्ये हायड्रोजन इंधन सेल आधारित तंत्रज्ञान बसवण्यासाठी कंत्राट केल आहे. 21 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान कंत्राट दाखल करता येतील.  निविदापूर्व बैठक 17 ऑगस्ट रोजी होणार आहे.

    अधिकारी म्हणाले की, हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या डेमू ट्रेनमुळे दरवर्षी सुमारे 2.3 कोटी रुपयांची बचत होईल.  आणि 11.12 किलोटन नायट्रोजन डायऑक्साइड आणि 0.72 किलोटन कार्बन कणांचे उत्सर्जन कमी होईल. या प्रणालीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून पाण्याचे विघटन करून हायड्रोजन प्राप्त होते.  हे आजपर्यंतचे सर्वात हिरवे इंधन मॉडेल मानले जाते. या प्रयोगाच्या यशानंतर, सर्व डिझेल इंजिन हायड्रोजन फ्यूएल सेलमध्ये रूपांतरित होतील.

    Now Indian Railways will run on hydrogen fuel, making India the third country to do so

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही