वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना लुभावण्यासाठी चढाओढीने पुढे चालले आहेत. यात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि अरविंद आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भर पडली आहे. Now Ayodhya has also been included in Delhi Govt’s Tirth Yatra Yojana; to be free of cost for the aged people. They can also bring a member/kin along: Delhi CM Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल यांनी परवाच अयोध्येत जाऊन राम लल्लांचे दर्शन घेतले आणि सायंकाळी शरयूच्या आरतीतते सामील झाले. आज केजरीवाल यांच्या दिल्ली कॅबिनेटने मुख्यमंत्री मोफत तीर्थयात्रा योजनेत अयोध्येचा समावेश केला आहे. ही योजना अरविंद केजरीवाल यांचे पेटंट योजना मानली जाते. दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना मोफत लागू आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबातील किंवा नजीकच्या एका व्यक्तीला आपल्याबरोबर तीर्थयात्रेत मोफत देऊ शकतात.
आतापर्यंत अयोध्येचा यात्रेत समावेश नव्हता. फक्त चार धाम यात्रा आणि निवडक धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश होता. परंतु, आता उत्तर प्रदेश निवडणूक जवळ आल्यामुळे अरविंद केजरीवाल सरकारने अयोध्येचा देखील मुख्यमंत्री मोफत तीर्थयात्रा योजनेत समावेश करून उत्तर प्रदेशातील मतदारांना वेगळ्या प्रकारे लुभावण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी विद्यार्थिनींना मोफत स्कुटी आणि अन्य सवलती देण्याच्या योजना आधीच जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी अयोध्येचा समावेश मुख्यमंत्री तीर्थयात्रेत करणे याला देखील राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
Now Ayodhya has also been included in Delhi Govt’s Tirth Yatra Yojana; to be free of cost for the aged people. They can also bring a member/kin along: Delhi CM Arvind Kejriwal
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी काँग्रेसला विजयी करा – नितीन बानगुडे पाटील
- AGAIN INDIA VS PAK : भारत-पाक सामन्यातील विक्रमांचा पाकला विसर ! हरभजनची धडाकेबाज ‘बोलिंग’ आणि मोहम्मद आमिर गपगार ! फिक्सर को सिक्सर-दोघांमध्ये तुफान ट्विटर वॉर….
- पेट्रोल-डिझेल कंपन्यांना दर ठरविण्याचा अधिकार काँग्रेस राजवटीत दिला; वारंवार इंधनाची दरवाढ
- अमृता फडणवीस यांचे दिवाळी निमित्ताने खास गाणे; सोशल मीडियावर गाण्याच्या ओळी पोस्ट शेअर