विशेष प्रतिनिधी
राजस्थान : कर्नाटकातील केजीएफनंतर (कोलार गोल्ड फायनरी) आता दुसरी केजीएफ भारतात येत आहे. कोटडी गोल्ड फायनरी असे तिचे नाव असू शकते. याचे कारण राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातला कोटडी भागात सोन्याची खाण सापडली आहे.Now another KGF, a gold mine found in Kotdi area of Rajasthan
2008 साली मिनरल एक्सप्लोरेशन कॉपोर्रेशननं कोटडी भागात सर्वेक्षण केलं. आता त्याचा अहवाल आला असून जमिनीत सोने आणि तांब्याचे मोठे साठे असल्याचे स्पष्ट झालं आहे.जमिनीखाली 60 ते 160 मीटर आतमध्ये हा खजिना दडला आहे.
या खाणीत 600 किलो सोनं आणि 250 टन तांब्याचे साठे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.भूविज्ञान विभागानं या खाणीसाठी निविदा जारी केली आहे. त्यात ब्लॉकची किंमत 1 हजार 840 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. निविदेची बोली 128 कोटींपासून सुरू होईल.
भीलवाडा जिल्ह्यात आशियातील सर्वात मोठ्या दोन खाणी आहेत. जगातील दुसरी आणि आशिया खंडातील सर्वात मोठी जस्ताची खाण जिल्ह्यातल्या आगूचा भागात आहे. त्यातच आता सोन्याची खाण मिळाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फायदा होणार आहे.
Now another KGF, a gold mine found in Kotdi area of Rajasthan
महत्त्वाच्या बातम्या
- वाईन पिऊन महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सरळ चालून दाखवावे; खासदार सुजय विखे पाटलांचे आव्हान!!
- अँटिलिया बॉम्ब प्लांटचा मुख्य सुत्रधार परमवीरसिंगच नवाब मलिक यांचा आरोप
- यंत्रणांची बेपर्वाई हेच बांधकाम कामगारांच्या मृत्युचे खरे कारण कामगार संघटनांची येरवडा प्रकरणी कारवाईची मागणी
- नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी; जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी