प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियमात सुधारणा केली आहे. त्यानुसार वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांना १ जानेवारी २०२३, १ एप्रिल २०२३, १ जुलै २०२३ आणि १ ऑक्टोबर २०२३ असे वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. Now 4 times a year for voter registration Apply
असा करा अर्ज
सद्य:स्थितीत भारत निवडणूक आयोगाचा छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यास मुदत आहे. या कालावधीमध्ये मतदार यादीत अजून नाव समाविष्ट नसलेल्या १८ वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना नाव नोंदवण्यासाठी नमुना अर्ज भरता येणार आहे. पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवावे.
नाव नोंदवण्यासाठी nvsp.in या संकेतस्थळावरुन, तसेच Voter Helpline App आपल्या मोबाइल उपाययोजनद्वारे नमुना अर्ज क्रमांक सहा भरावा किंवा आपल्या नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
Now 4 times a year for voter registration Apply
महत्वाच्या बातम्या