विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : धार्मिक स्थळांवर लावलेल्या लाऊडस्पीकरच्या आवाजांबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. दोन्ही राज्यांमध्ये ध्वनिक्षेपकाचा आवाज विहित मर्यादेत ठेवण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या असून उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल. Notice to mosques in Karnataka over loudspeaker noises
बेंगळुरूचे पोलिस आयुक्त कमल पंत यांनी गुरुवारी सांगितले की १२५ मशिदी, ८३ मंदिरे, २२ चर्च, ५९पब, बार आणि रेस्टॉरंट आणि १२ उद्योगांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. लाऊडस्पीकर अनुज्ञेय डेसिबल पातळीवर ठेवावा, असे सांगण्यात आले.
राज्य सरकारमधील मंत्री के एस ईश्वरप्पा म्हणाले की, लाऊडस्पीकरद्वारे मुस्लिमांच्या अजान आणि हिंदूंच्या हनुमान चालिसासाठी कोणतीही स्पर्धा नाही. त्याचवेळी शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्रालयाची याबाबत आधीच मार्गदर्शक सूचना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनीही लाऊडस्पीकर बाबत नोटीस बजावली आहे.
आवाज कमी ठेवण्यासाठी उपकरणे : मौलाना मकसूद
बंगळुरूच्या जामिया मशीद सिटी मार्केटचे इमाम मौलाना मकसूद इम्रान म्हणाले, ”अनेक मशिदींना नोटिसा मिळाल्या आहेत. आम्ही उपकरणे बसवण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून आवाज परवानगी पातळीपेक्षा जास्त होणार नाही आणि कोणालाही त्रास होणार नाही. ”
निवासी भागात दिवसा ५५ डेसिबल, रात्री ४५ डेसिबलच्या मर्यादेला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ डेसिबल, रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक भागात दिवसा ६५ आणि रात्री ५५ डेसिबल डेसिबल आवाजाची परवानगी आहे.
Notice to mosques in Karnataka over loudspeaker noises
महत्त्वाच्या बातम्या
- त्या दोघी म्हणतात आम्ही एकत्रच राहणार, पुण्यात समलिंगी तरुणींचा लिव्ह इन करार
- निरपराधांच्या नरसंहारामुळे संताप, रशियाला यूनोच्या मानवी हक्क समितीतून केले निलंबित
- चीनच्या कच्छपि लागून श्रीलंकेत आगडोंब, मानवतावादी भूमिकेतून भारताकडून पुन्हा ७५ हजार मेट्रिक टन इंधन पुरवठा, जीवनावश्यक औषधांचीही मदत
- प्रभाग रचनेचे अधिकार काढून घेणाऱ्या आणि निवडणुकीची प्रक्रिया रद्द ठरविणाऱ्या कायद्यांना सर्वोच्च आव्हान, महाविकास आघाडी सरकारने केले होते कायदे