• Download App
    एवढी खाज बरी नाही!!; संजय राऊतांचे राज्यपाल भगतसिंह कोशियारींवर अश्लील भाषेत टीकास्त्र । Not so itchy !!; Sanjay Raut criticizes Governor Bhagat Singh Koshiyari in obscene language

    एवढी खाज बरी नाही!!; संजय राऊतांचे राज्यपाल भगतसिंह कोशियारींवर अश्लील भाषेत टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शिवसेनेच्या सर्व खासदारांनी राष्ट्रवादी विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला असताना दुसरीकडे मात्र शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मात्र आपली संपूर्ण भडास महाराष्ट्राच्या राज्यपालांवर काढून घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्यावर संजय राऊत यांनी अश्लील भाषेत टीकास्त्र सोडले आहे. Not so itchy !!; Sanjay Raut criticizes Governor Bhagat Singh Koshiyari in obscene language

    राज्यपालांचे अधिकार काढून घेणारा कायदा राज्य सरकारने बनवला. आता याच विद्यापीठ कायद्यावरुन पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी विद्यापीठात कुलगुरुंची नियुक्ती करण्यास सुरुवात केल्याने आता वादाला तोंड फुटले. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. आम्ही संघर्ष करत नाहीत. त्यांना खाजवायची सवय लागली आहे. त्यांची खाज कधी संपेल माहीत नाही. पण एवढी खाज बरी नाही, अशा अश्लील शब्दांत संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

    उद्धव ठाकरेंसोबत बैठक होईल

    शिवसेनेच्या सर्व खासदारांनी संजय राऊत यांच्या कालच्या डिनर डिप्लोमसी राष्ट्रवादीवर आपला संताप उगवून घेतला राष्ट्रवादी शिवसेनेची जागोजागी कोंडी करते आहे प्रत्येक मतदार संघामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शिवसैनिकांचा संघर्ष आहे अशा वेळी शिवसेनेचे नेतृत्व वेळीच जागे झाले नाही तर पुढची निवडणूक लढवणे देखिल कठीण होईल असा गंभीर इशारा संजय रावजी यांच्यासमोर सर्व खासदारांनी दिला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. पण राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्यावर मात्र त्यांनी अश्लील शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले.



    खासदारांच्या तक्रारींचे “सौम्यीकरण”

    यावेळी संजय राऊत यांनी खासदार यांच्या तक्रारींना डाऊन प्ले करण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले, सोमवारी सायंकाळी शिवसेना पक्षाची बैठक झाली. या बैठकीत खासदारांनी काही भूमिका मांडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचनेने शिवसंवादाच्या निमित्ताने खासदार विदर्भात गेले होते. त्यांनी अहवाल तयार केला आहे.

    – अधिवेशनानंतर खासदार – मुख्यमंत्री भेट

    संसदेचे अधिवशेन संपल्यावर उद्धव ठाकरेंसोबत सर्व खासदारांची बैठक होईल. या दौऱ्यात जो अनुभव आला त्यावर आणि संघटनात्मक त्रुटीवर चर्चा केली जाईल. खासदारांच्या काही तक्रारी आहेत, असे पत्रकार म्हणतात. पण त्यात तथ्य नाही. काही ठिकाणी मजबुतीने काम करावे लागेल हे मात्र खरे आहे. शिवसेनेच्या मंत्र्याबाबत बोलता येणार नाही. आघाडी म्हणून प्रत्येक मंत्र्याचे कर्तव्य आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाचे ऐकले पाहिजे. त्याला मदत केली पाहिजे. इतर पक्षाचा पालकमंत्री असेल तर तो दुसऱ्या पक्षाकडे दुर्लक्ष करतो. या गोष्टी कॉमन असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

    Not so itchy !!; Sanjay Raut criticizes Governor Bhagat Singh Koshiyari in obscene language

    महत्त्वाच्या बातम्या

    Anil Deshmukh CBI : अनिल देशमुख तब्येतीच्या आडून सीबीआय चौकशी टाळतात; स्पेशल कोर्टात सीबीआयचा आरोप

    मुर्तझा अब्बासी झाकीर नाईकचा फॉलोअर; गोरखनाथ मंदिर हल्ला प्रकरणातील आरोपी

    रेरा, तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून साडेदहा हजार दस्तांची नोंद – ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

    घोडावत ग्रुपच्या महसुलात भरघोस वाढ; १४०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

    ई-वाहनांचा वापर ही काळाची गरज – नितीन राऊत

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते