प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकारला केंद्रात आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. याबाबत देश – विदेशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कौतुक आणि विरोधकांकडून टीकेचा भडिमार होत असताना, त्या दोन्हींमध्ये न गुंतून पडता आता भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी तयारीला सुरुवात केली आहे. 2019 च्या निवडणुकांमध्ये ज्या जागांवर म्हणजे लोकसभा मतदारसंघात भाजपला मतांच्या फार थोड्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्या जागांवर भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे. देशभरातील अशा एकूण 144 लोकसभा जागांसाठी भाजपने आता मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. भाजपचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी याबाबतची माहिती दिली आहे. Not section 144, mission 144 for BJP; Building a front with meticulous planning
असा आहे प्लॅन
याठिकाणी केंद्रीय मंत्र्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क अभियानाचे भाजपने नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात भाजप 144 लोकसभा जागा आणि त्याअंतर्गत येणा-या विधानसभा जागांबाबत माहिती घेणार असून, या जागांवर बूथ मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
असे होणार काम
पुढील 18 महिने भाजप या जागांवर काम करणार आहे. यासाठी 3 स्तर निश्चित केले जातील. पहिल्या स्तरात एक केंद्रीय समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचा समावेश असणार आहे. ही समिती या संपूर्ण कार्यक्रमाची देखरेख करणार आहे. दुस-या स्तरावर एक समिती राज्य स्तरावर काम करणार असून, या समितीच्या माध्यमातून योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणार आहे. तर तिस-या स्तरावर असणा-या क्लस्टर समितीमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असणार आहे. ही समिती संपूर्ण कामकाजाची पाहणी करणार आहे, तसेच केंद्र आणि राज्य स्तरांवर स्थापन झालेल्या समितींमध्ये समन्वय साधण्याचे काम करणार आहे.
– प्रभारींवर मोठी जबाबदारी
या योजनेनुसार, पक्षाचे संघटनात्मक प्रभारी दर 15 दिवसांतून एकदा प्रत्येक लोकसभा मतदारसंघांना भेट देणार आहेत, तर लोकसभा प्रभारी पहिले दोन महिने या लोकसभा मतदासंघांतर्गत येणा-या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. याआधारे पक्षाच्या बाजूने आणि पक्षाच्या विरोधात असणा-या मुद्द्यांचा डेटा तयार करण्याची जबाबदारी या प्रभारींवर सोपवण्यात येणार आहे.
या 144 जागांवर लक्ष केंद्रित करून त्यातून 60 ते 70 % जरी यश मिळाले तरी भाजपच्या विजयात 70 ते 90 जागांची भर पडे शकेल. किंबहुना भाजपची टॅली 2019 च्या 303 जागांच्या पुढे 350 चा आकडा ओलांडून पुढे जाईल, असे हे नियोजन आहे.
Not section 144, mission 144 for BJP; Building a front with meticulous planning
हत्वाच्या बातम्या
- ब्राह्मण संघटना शरद पवारांकडे चर्चेला गेल्याच कशाला??; प्रकाश महाजन यांचा परखड सवाल
- पेट्रोल – डिझेल : रुपया – रूबल दर विनिमय दराच्या नियोजनातून रशियाकडून स्वस्त तेल खरेदीची मोदी सरकारची तयारी
- खंजीर खुपसण्याची भाषा जपून वापरा!!; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा मराठा संघटनांना इशारा
- चिंतन फळता फळेना; गळती थांबता थांबेना!!; कपिल सिब्बल काँग्रेस सोडून समाजवादीच्या पाठिंब्यावर राज्यसभेच्या वाटेवर!!