प्रतिनिधी
नवी दिल्ली : एक महिना उलटून गेला त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?, याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला अजूनही हिरवा कंदील मिळत नसल्यामुळे विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची देखील जोरदार चर्चा होत आहे. Not related to cabinet expansion, no works blocked
शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि दिल्ली दौऱ्याबाबत मोठे विधान केले आहे. दिल्ली दौरा आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
आज़ादी का अमृत महोत्सवाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलावली आहे, तर रविवारी नीती आयोगाची बैठक होणार आहे. त्यामुळे या दोन्ही महत्वाच्या बैठकांसाठी मी दिल्लीत आलो आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि माझ्या दिल्ली दौऱ्याचा काहीही संबंध नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
विस्ताराला कोणताही अडथळा नाही
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात कोणताही अडथळा किंवा अडचण नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा लवकरच होणार आहे. आम्ही कुठलीही कामे थांबवलेली नाहीत, निर्णय प्रक्रियेत देखील समन्वयाचा कोणताही अभाव नाही, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीसनवर जोरदार शरसंधान साधले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली कामे कोणतीही अडलेली नाहीत, असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
Not related to cabinet expansion, no works blocked
महत्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, बांठिया अहवालातील त्रुटी दूर करण्याची मागणी
- मुंबईत तब्बल १४०० कोटींचे ड्रग्ज जप्त, अमली पदार्थांचा ७०० किलोचा साठा
- जस्टिस उदय यू. लळीत होणार देशाचे ४९ वे सरन्यायाधीश, २७ ऑगस्टला शपथविधी, ८ नोव्हेंबरपर्यंत कार्यकाळ
- जुन्याच वॉर्ड रचनेनुसार निवडणूक; महाविकास आघाडीसह काँग्रेसमध्ये फूट पाडायला कारणीभूत!!