• Download App
    घरभाडे न भरणे हा गुन्हा नाही, कायदेशीर कारवाई मात्र नक्कीच ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। Not paying rent is not a crime, it is a legal action But of course; Supreme Court decision

    घरभाडे न भरणे हा गुन्हा नाही, कायदेशीर कारवाई मात्र नक्कीच ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली: भाडे न भरणे हा गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. घरमालकाने भाडेकरूविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. तो एफआयआर रद्द करून न्यायालयाने हा निकाल दिला. या निकालाने भाड्याने राहणार्‍या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. Not paying rent is not a crime, it is a legal action But of course; Supreme Court decision

    या प्रकरणात एफआयआर रद्द करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्याविरोधात दाखल झालेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालय म्हणाले की, भाडेकरूने अडचणींमुळे भाडे भरले नाही तर तो गुन्हा ठरणार नाही. तसेच याप्रकरणी कोणतीही शिक्षा नाही, असेही न्यायालयाने निकाल देताना नमूद केले. हा निकाल नीतू सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार यांच्या याचिकेशी संबंधित आहे.



    न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तक्रारीत दिलेले तथ्य खरे असले तरी हा गुन्हा नाही असे आमचे मत आहे. भाडे न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, परंतु गुन्हा दाखल केला जाणार नाही. तसेच तशी परिस्थितीही नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित एफआयआर रद्द केलं आहे.

    Not paying rent is not a crime, it is a legal action But of course; Supreme Court decision

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही