• Download App
    जन पद्म : पद्म पुरस्कार 2022 साठी 15 सप्टेंबरपर्यंत करू शकता नामांकन, ऑनलाइन नामांकनाची सुविधा Nominations for the Padma Awards 2022 can be made till September 15

    जन पद्म : पद्म पुरस्कार २०२२ साठी १५ सप्टेंबरपर्यंत करू शकता नामांकन, ऑनलाइन नामांकनाची सुविधा

    2022 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी (पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री) ऑनलाईन नामांकन खुले आहेत.  यासाठी नामांकन करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे. Nominations for the Padma Awards 2022 can be made till September 15


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 2022 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी (पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री) ऑनलाईन नामांकन खुले आहेत.  यासाठी नामांकन करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.

    गृह मंत्रालयाच्या निवेदनानुसार, पद्म पुरस्कारांचे ‘जन पद्म’मध्ये रूपांतर करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी नामांकने नोंदवावीत.

    महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, अपंग व्यक्ती आणि नि:स्वार्थपणे समाजाची सेवा करणाऱ्या अशा प्रतिभावान व्यक्तींची ओळख करण्यासाठी सामूहिक सशक्त प्रयत्न केले जाऊ शकतात.

    पद्म पोर्टलवर नामांकन भरत असताना उपलब्ध प्रारूपात ते भरावे, त्यात वर्णनात्मक (जास्तीत जास्त 800 शब्द) तपशील समाविष्ट असावा. ज्यात व्यक्तीच्या विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरीचा आणि प्रदान केलेल्या सेवांचा समावेश असावा.

    अपवादात्मक सेवा असूनही पुरस्कारासाठी विचारात न घेतलेल्या संभाव्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आधीच विशेष शोध समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. 2014 पासून मोदी सरकार अशा ‘नायकांना’ पद्म पुरस्कार देत आहे, ज्यांनी विविध प्रकारे समाजात योगदान दिले आहे.

    राज्यांना नुकत्याच लिहिलेल्या पत्रात, गृह मंत्रालयाने म्हटले होते की, बऱ्याचदा अशा अनेक लोकांकडे दुर्लक्ष होऊ शकते, कारण ते सार्वजनिक क्षेत्रात प्रसिद्धीसाठी काम करत नाहीत. गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “अशा व्यक्तींना ओळखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा पात्र व्यक्तींमुळे या पुरस्कारांची प्रतिष्ठा वाढेल.”

    निवेदनात पुढे म्हटले आहे की, वरील पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिन 2022च्या निमित्ताने जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी योग्य नामांकने पाठवावीत ही विनंती आहे. राज्यांना यासंदर्भात असे सुचवण्यात येत आहे की, तुम्ही अशा व्यक्तींचा शोध घेण्यासाठी, त्यावर विचार करण्यासाठी आणि अंतिम रूप देण्यासाठी एक विशेष शोध समितीही स्थापन करू शकता.

    Nominations for the Padma Awards 2022 can be made till September 15

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज