• Download App
    अजानच्या भोंग्यांनी ध्वनी प्रदूषण होत नाही; नागपूर जामा मशिदीच्या चेअरमनचा दावा!! Noise pollution is not caused by Ajan's bells; Nagpur Jama Masjid chairman claims

    मशिदींवरचे भोंगे : अजानच्या भोंग्यांनी ध्वनी प्रदूषण होत नाही; नागपूर जामा मशिदीच्या चेअरमनचा दावा!!

    वृत्तसंस्था

    नागपूर : मशिदीं मध्ये अजान होते. पण त्या अजानच्या भोंग्यांनी ध्वनी प्रदूषण होत नाही, असा दावा नागपूरच्या जामा मशिदीचे चेअरमन मोहम्मद फजलूर रहमान यांनी केला आहे. Noise pollution is not caused by Ajan’s bells; Nagpur Jama Masjid chairman claims

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात मशिदींवरचे भोंगे उतरवा अन्यथा हनुमान चालीसा दुप्पटा आवाजात लावण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये मशिदींवरच्या भोंग्यांवरून वाद पेटला आहे.

    कर्नाटकची राजधानी बंगलुरू मध्ये पोलिसांनी 125 पेक्षा जास्त मशिदींना आवाज मर्यादित ठेवण्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत. त्याचबरोबर 89 मंदिरांनाही नोटिशी दिल्या आहेत.

    या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या मशिदींनी वेगळी भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे. नागपूरच्या जामा मशिदीचे चेअरमन मोहम्मद फजल उर रहमान यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मशिदीं मधली अजान फक्त 2 ते 2.5 मिनिटांची असते. त्यामुळे आवाजात वाढ होत नाही. भोग्यांवरून फक्त अजानची सूचना दिली जाते. इतर कार्यक्रमांच्या भोंग्यांमुळेच ध्वनिप्रदूषण होते, असा दावा रहमान यांनी केला आहे. रहमान यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा भोंग्यांचा वाद उफाळण्याची करण्याची शक्यता आहे.

    Noise pollution is not caused by Ajan’s bells; Nagpur Jama Masjid chairman claims

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या

    Lucknow High Court : लखनऊ हायकोर्टाने केंद्राला म्हटले- राहुल ब्रिटिश आहेत की नाही, 10 दिवसांत रिपोर्ट द्या!