विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीमध्ये वासराच्या सीरमचा (रक्तामधील पातळ प्रथिन द्रव) समावेश असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियातील पोस्ट चुकीच्या असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. No serum in Covaxine
मानवी शरीरारातील व्हेरो सेल्सच्या निर्मितीबरोबरच त्यांच्या वाढीसाठी गायीच्या नवजात बछड्याच्या सीरमचा वापर करावा लागतो. सर्वसाधारणपणे गोवंशातील प्राण्यांच्या शरीरातूनच हे सीरम काढले जाते, जगभर त्याचा वापर हा व्हेरो सेल्सच्या वाढीसाठी केला जातो. पोलिओ, रेबीज आणि हिवतापावरील विविध लशींच्या निर्मितीसाठी याच तंत्राचा वापर करण्यात येतो असा दावा संबंधित पोस्टमध्ये करण्यात आला होता.
याबाबत आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहेकी, मृत झालेल्या आणि निष्क्रिय विषाणूचा नंतर शेवटच्या टप्प्यातील लस तयार करण्यासाठी वापर केला जातो. येथे कोठेही वासराच्या सीरमचा वापर केला जात नाही, त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या निर्मितीमध्येही त्याचा समावेश नाही.
लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात अजूनही शंका कुशंका आहेत. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकराच्या अफवांचा वेगाने प्रसार होत आहे. त्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेवरदेखील विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिल्याचे मानले जाते.
No serum in Covaxine
महत्त्वाच्या बातम्या
- आंध्र प्रदेशमध्ये चकमकीत सहा माओवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त; शोधमोहीम सुरू राहणार
- दहावी-बारावीच्या निकालावर शिक्षकांचा बहिष्कार, लोकल प्रवासाची मुभा नसल्याने संतापाची लाट
- लोकसभा जिंकण्यासाठी देशात सर्वाधिक खर्च केला तो शशी थरुर यांनी…
- Corona Vaccination : कोविन अॅपवर ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे बंधन नाही , आता केंद्रावरच थेट लस ;आरोग्य मंत्रालयाची माहिती
- हेल्मेट न घालण्यामध्ये पुणेकर प्रथम ; राज्यात ८० कोटी रुपयांचा दंड वसूल