• Download App
    कर्नाटकात मराठा समाजाला आरक्षण फेटाळले, ओबीसी आयोगाने घेतला निर्णय । No reservation to Maratha in Karnataka

    कर्नाटकात मराठा समाजाला आरक्षण फेटाळले, ओबीसी आयोगाने घेतला निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    बेळगाव : कर्नाटकात मराठा समाजाला इतर मागास वर्ग ‘३ बी’ प्रवर्गातून ‘२ ए’ प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेने केलेली मागणी कर्नाटक राज्य इतर मागासवर्ग आयोगाने फेटाळली आहे. No reservation to Maratha in Karnataka

    बंगळूर येथील कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदचे अध्यक्ष सुरेश साठे यांनी राज्य इतर मागास वर्ग आयोगाकडे याबाबतचे निवेदन पाठविले होते. त्यावर आयोगाने साठे यांना पत्र पाठविले असून यात ही मागणी फेटाळण्यात आली आहे. साठे यांनी १७ जून २०१९ रोजी आयोगाला कर्नाटकातील मराठा समाजाला प्रवर्ग ‘३ बी’ मधून ‘२ ए’ मध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली होती.



    त्यास आयोगाने नुकतेच पत्राद्वारे उत्तर पाठविले असून यात, राज्य इतर मागास वर्ग आयोगाचे मागील अध्यक्ष शंकरप्पा यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने मराठा समाजाला २ ए मध्ये समाविष्ट करण्यासंबंधीचे आठ सल्ले आणि सूचना असलेला अहवाल २०१२ साली कर्नाटक सरकारला पाठविला आहे. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

    आयोगाकडून अधिनियम १९९५ अ नुसार पुन्हा त्याच मागणीवरील अर्जाची पुनर्रपडताळणी करता येत नसल्याचे कारण देत हा अर्ज फेटाळण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

    No reservation to Maratha in Karnataka

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न