विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – आयआयटी दिल्ली, जामिया मिलिया इस्लामिया, इंडियन मेडिकल असोसिएशन, नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी यासारख्या देशभरातील तब्बल सहा हजारांपेक्षाही अधिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) परदेशातून मिळणाऱ्या निधीला ब्रेक लागला आहे.No permission to six thousand ngos for taking fund
यातील अनेक संस्थांच्या परवान्यांचे नूतनीकरण झालेले नसल्याने तर काहींना केंद्राने सूचना दिल्यानंतर देखील त्यांनी परवान्याचे नूतनीकरण निर्धारित वेळेमध्ये न केल्याने त्यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देशातील सहा हजारांपेक्षाही अधिक संघटना आणि स्वयंसेवी संस्था यांनी त्यांच्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज केला नव्हता. या परवाना नूतनीकरणाची डेडलाईन ही शुक्रवारी (ता.३१) संपत असल्याने या संस्थांना केंद्राकडून तशी आठवण देखील करून देण्यात आली होती
पण त्यातील अनेकांनी त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण केलेले नव्हते. अशा स्थितीमध्ये या संस्थांना परवानगी दिली जाऊ शकत नाही.कोणतीही संघटना असो अथवा संस्थेला परकी निधी मिळविण्यासाठी ‘एफसीआरए’ कायद्याअंतर्गत नोंदणी करणे गरजेचे असते.
देशातील ‘एफसीआरए’अंतर्गत नोंदणी असलेल्या स्वयंसेवी संस्थांची संख्या शुक्रवारपर्यंत २२ हजार ७६२ एवढी होत, शनिवारी ती १६ हजार ८२९ वर पोचली. देशातील जवळपास ५ हजार ९३३ संस्थांची नोंदणी ही रद्द झाल्याचे दिसून आले आहे.
No permission to six thousand ngos for taking fund
महत्त्वाच्या बातम्या
- स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त ७५ कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार, केंद्रीय अनुदान आयोगाचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन
- राजकारणासाठी अर्थकारण पणाला, अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात केली मोफत वीजेची घोषणा
- मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने दिली जॅकलीनसोबतच्या संबंधांची कबुली
- सरकारी बस चालविण्याच्या हट्टासाठी तरुणीने परिवहन मंत्र्यांची गाडीच अडवली