• Download App
    सुईच्या टोकाइतकीही भारताची जमीन कोणी घेऊ शकत नाही – गृहमंत्री अमित शाहांचा चीनला इशारा!No one can take even an inch of Indias land Home Minister Amit Shahs warning to China

    सुईच्या टोकाइतकीही भारताची जमीन कोणी घेऊ शकत नाही – गृहमंत्री अमित शाहांचा चीनला इशारा!

    ‘’तो काळ आता गेला जेव्हा भारताच्या जमीनीवर कोणीही अतिक्रमण करू शकत होतं.’’, असंही म्हणाले.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी चीनवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, ‘’आता आमच्या सीमेकडे कोणीही डोळे वर करून पाहू शकत नाही. तो काळ आता गेला जेव्हा भारताच्या जमीनीवर कोणीही अतिक्रमण करू शकत होतं.’’ No one can take even an inch of Indias land  Home Minister Amit Shahs warning to China

    असे मानले जाते की चीनने नुकतीच अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्या नकाशातील ११ ठिकाणांची नावे बदलली आहेत. यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गृहमंत्र्यांचा अरुणाचल दौरा चीनसाठी मोठा संकेत मानला जात आहे. गृहमंत्र्यांचा दृष्टिकोनही या काळात अतिशय टोकदार असल्याचे दिसून येते.

    याशिवाय शाह यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, १९६२ च्या युद्धासाठी आलेल्यांना येथील लोकांच्या देशभक्तीमुळे परत जावे लागले. भारताची सुईच्या टोकाइतकीही जमीन कोणीही घेऊ शकत नाही.

    या दरम्यान अरुणाचलमध्ये भाजपाने केलेल्या कामांची मोजदाद करताना शाह म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी एक काळ असा होता की येथील गावे रिकामी होत होती, विकास नव्हता. मात्र केंद्रातील मोदी सरकारने या गावांची काळजी घेत या ठिकाणी विकास घडवून आणला आहे. ही भारतातील पहिली गावं आहे जिथे रोजगार देण्याचे कामही भाजप सरकारने केले आहे.

    शहा यांनी वातावरणाचे कौतुक केले –

    अमित शाह यांनी या ठिकाणच्या भौतिक सौंदर्याची प्रशंसा केली आहे. अरुणाचलला पोहोचल्यावर भारतातील पहिल्या गावाचा धबधबा पाहून आनंदाने भरून आल्याचे त्यांनी सांगितले. भारतात सर्वात आधी सूर्य उगवणारे हे गाव आहे. शाह यांनी १९६२ च्या युद्धाची आठवण करून दिली आणि त्या वेळी लढलेल्या 6 अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.स्थानिक लोकांचे कौतुक करताना ते म्हणाले की, येथील लोकांमध्ये भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलांबद्दल आदराची भावना आहे.

    No one can take even an inch of Indias land  Home Minister Amit Shahs warning to China

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले