• Download App
    माझ्या नावावर कुणालाही घाबरविण्याची गरज नाही, योगी आदित्यनाथ यांनी दिले मुस्लिम समाजाला आश्वासन|No need to scare anyone in my name, Yogi Adityanath assured the Muslim community

    माझ्या नावावर कुणालाही घाबरविण्याची गरज नाही, योगी आदित्यनाथ यांनी दिले मुस्लिम समाजाला आश्वासन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : माझ्या नावावर कुणालाही घाबरण्याची गरज नाही. जो कुणी कायद्याचं पालन करेल, काद्याच्या राज्यावर ज्याचा विश्वास असेल त्याला अत्यंत सन्मानाने आणि गौरवाने उत्तर प्रदेशमध्ये राहाण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण कुणी कायदाच पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो कुणीही असला तरी त्याच्यावर कायदा कारवाई करेल,No need to scare anyone in my name, Yogi Adityanath assured the Muslim community

    असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.सामाजिक तेढ निर्माण करून त्यावर राजकीय पोळी भाजली जात असल्याचा आरोप करण्याच्या पार्श्वभूमीवर न्यूज अँकरनं योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या सरकारवर होत असलेल्या आरोपांविषयी विचारणा केली.



    उत्तर प्रदेशमध्ये तुमच्या नावाने मुस्लमिमांना घाबरवलं जातं, आम्हाला मत द्या नाहीतर योगी (आदित्यनाथ) येतील असं सांगितलं जात असल्याचं न्यूज अँकरनं म्हणताच योगी आदित्यनाथ यांनी त्यावर उत्तर दिले.
    योगी आदित्यनाथ म्हणाले, जे कायदा पायदळी तुडवत होते, उत्तर प्रदेशमध्ये दंगली घडवत होते,

    आया-बहिणींच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण झाले होते, व्यापाºयांसाठी धोका ठरले होते. उत्तर प्रदेशमधल्या लोकांना पळायला लावत होते त्यांच्यावरच गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशमधून पळ काढण्याची वेळ आली आहे. जर कुणी याला जातिधमार्शी जोडू पाहात असेल, तर ते त्यांचं मत असेल. उत्तर प्रदेशच्या सामान्य रहिवाशांचे नाहीत.

    No need to scare anyone in my name, Yogi Adityanath assured the Muslim community

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज