• Download App
    कोणतीही भाषा कमी दर्जाची नाही, घरात मुलांशी मातृभाषेतच बोलण्याचे अमित शहा यांचे आवाहन|No language is inferior, Amit Shah appeals to speak to children in mother tongue at home

    कोणतीही भाषा कमी दर्जाची नाही, घरात मुलांशी मातृभाषेतच बोलण्याचे अमित शहा यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: हिंदी ही सर्वच प्रादेशिक भाषांना जोडणारा दुआ आहे. मात्र, कोणतीही भाषा कमी दर्जाची नसल्यामुळे सर्वच भाषांना प्रोत्साहन मिळायला हवे. घरात मुलांशी मातृभाषतूनच बोला असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.No language is inferior, Amit Shah appeals to speak to children in mother tongue at home

    हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शहा म्हणाले, आपली मुले इंग्रजी माध्यम शाळेत शिकत असली, तरी पालकांनी त्यांच्यासोबत घरात मातृभाषेतच संवाद साधावा, जेणेकरून मुलांना आपल्या मातृभाषेची ओळख होईल. आपण घरात मुलांशी मातृभाषेत बोललो नाही, तर मुलांचा आपल्या भाषेसोबतचा संबंधच संपुष्टात येईल. आपल्या भाषेचे महत्त्व त्यांना कधीच कळणार नाही.



    देशातील अन्य प्रादेशिक भाषा आणि हिंदी भाषेत फार जास्त फरक नाही. हिंदी ही देशातील सर्वच प्रादेशिक भाषांची मित्र आहे. देशातील सर्वच भाषा महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे सर्व भाषांना प्रोत्साहन देणे ही आजची मोठी गरज आहे.

    2014 पासून बहुतांश खासदार संसदेत आपल्या मातृभाषेतच बोलत आहेत. ते जे काही बोलतात, त्याचा इंग्रजी आणि हिंदीत अनुवाद करण्यात येतो. यामुळे हे सर्व लोकप्रतिनिधी जनतेच्या समस्यांना अधिक प्रभावीपणे मांडू शकतात, असे शहा यांनी सांगितले.

    No language is inferior, Amit Shah appeals to speak to children in mother tongue at home

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो