विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशातील ६२ जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत कोरोनाच्या एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. त्याचप्रमाणे, उर्वरित राज्यातही केवळ १८ रुग्ण आढळले. त्यामुळे, राज्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर अवघ्या ०.०१ टकक्यावर आला आहे.No corona patients in UP in last 24 hours
सध्या उत्तर प्रदेशात कोरोनाचे केवळ २३५ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनातून बरे होण्याचा दर ९८.७ टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत सात कोटी नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.
देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात कोरोनाचा उद्रेक कमी होत असल्याने टास्क फोर्सने आता सुटकेच्या निश्वास सोडला आहे. साऱ्या देशात येत्या काळात अशीच परिस्थीती राहिल्याचे त्याचे चांगले परिणाम दिसतील.
No corona patients in UP in last 24 hours
महत्त्वाच्या बातम्या
- महामारीशी लढण्यास अर्थव्यवस्था शिकली, अल्पावधीत रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागेल : आरबीआय एमपीसी सदस्य
- अमरुल्लाह सालेह यांचा ‘बचेंगे तो और भी लढेंगे’चा पवित्रा, गार्डला म्हणाले – “जखमी झालो, तर थेट माझ्या डोक्यात गोळी मारा”
- पवार म्हणाले, ‘माझ्याकडे १० वर्षे कृषी मंत्रालय होते, पण शेतकऱ्यांना उत्पादन फेकण्याची वेळ आली नाही’, पण याच कार्यकाळातील शेतकरी आत्महत्यांचा पडला विसर
- Teachers Day : शिक्षकदिनी महाराष्ट्रातील दोन शिक्षकांसह 44 जणांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान; राष्ट्रपतींचे बोधप्रद भाषण, वाचा सविस्तर…