विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‘क्लीनचिट’ देणारा कोणताही अहवाल जारी करण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण सीबीआयने दिले आहे. No clin Chit to Anil Deshmukh
देशमुख यांना ‘सीबीआय’च्या प्राथमिक तपासात ‘क्लीनचिट’ मिळाली अशा आशयाच्या बातम्या गेले काही दिवस व्हायरल होत आहेत. सीबीआयने देशमुख यांना ‘क्लीनचिट’ दिल्याचे वृत्त ‘सीबीआय’ने फेटाळले आहे. याबाबत ‘सीबीआय’चे एक पत्र आता व्हायरल होत आहे. त्यानुसार प्राथमिक तपासानुसार देशमुख यांनी हेतुपूर्वक हा गुन्हा केल्याचे सिद्ध होत आहे.
देशमुख व अन्य अज्ञात लोकांनी अनुचित आणि गैरमार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला, असे प्राथमिक तपासात आढळल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार निवारण कायदा १९८८ च्या कलम ७ नुसार नियमित गुन्हेगारी खटला दाखल करण्याची शिफारस सीबीआयने केली असल्याचे आता सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे याला मुंबई मधील बहुतांश महत्त्वपूर्ण आणि संशयास्पद कारणांचा तपास सोपविण्यात आला होता.
No clin Chit to Anil Deshmukh
महत्त्वाच्या बातम्या
- टोकियोमध्ये पदकांची लयलूट; देवेंद्र झांजरिया, योगेश कथुनिया यांना रौप्य पदक; तर सुंदर सिंगला ब्राँझपदक
- Jai Kanhaiya Lal ki : गोकुळाष्टमी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले ; पहा फोटो
- योगेश काथुनियाला टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये थाळीफेकमध्ये रौप्यपदक ; भारताची आणखी एक चमकदार कामगिरी
- Tokyo Paralympics 2020 : अवनी लेखराने घेतला “सुवर्णवेध”; नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक