वृत्तसंस्था
पाटणा : देशात जात निहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे नेते नितीश कुमार आग्रही आहेत. त्यांनी आपल्या आग्रहातून बिहार मधल्या विविध पक्षांच्या नेत्यांना या मागणीसाठी एकत्र जोडून घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 11 पक्षांचे शिष्टमंडळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातले भाजपचे मंत्री जनकराम यांचाही समावेश आहे. Nitish Kumar will meet the Prime Minister for this demand for caste wise census; The 11-party delegation also includes BJP leaders
नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच जात निहाय जनगणनेचा आग्रह पुन्हा चालवायला सुरुवात केली. देशात हिन्दुत्वाचे वातावरण मोठ्या प्रमाणावर वाढत असताना जातीचे राजकारण संपण्याची भीती निर्माण झाली आणि ज्या अनेक प्रादेशिक पक्षांचा तो मुख्य आधार आहे, जातीचे राजकारण हिंदुत्वाचा राज कारणात संपुष्टात येऊ नये यासाठी नितीश कुमार यांनी जात निहाय जनगणनेचा प्रस्ताव मांडून जातीच्या राजकारणाच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न चालवला आहे.
यामध्ये सध्या बिहारमधल्या 11 पक्षांचा समावेश आहे. परंतु नितीशकुमार यांचे प्रयत्न प्रत्यक्षात देशातल्या प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीचे आहेत आणि ते केवळ हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यापुरते मर्यादित नाहीत, तर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वेगवेगळ्या प्रयत्नांना काटशह देणारेही आहेत. कारण या दोन्ही नेत्यांचे प्रयत्न “मोदी विरोध” या एकमेव अजेंड्याभोवती फिरत आहेत, तर नितीश कुमार यांनी जातनिहाय राजकारणाचा मुद्दा देशाचा अजेंड्यावर आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांचे प्रयत्न सोनिया आणि ममता यांच्यापेक्षा अधिक गंभीर आणि देशाच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम करणारे वाटतात.
Nitish Kumar will meet the Prime Minister for this demand for caste wise census; The 11-party delegation also includes BJP leaders
महत्त्वाच्या बातम्या
- अफगणिस्थानमधून भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक
- भूसंपादनातील विलंब, वन आणि पर्यावरण मंत्रालयांच्या मंजुरीअभावी रखडलेत ४८३ प्रकल्प, ४.४३ ला रुपये खर्च जादा होणार
- ३७०च्या दणक्यानंतर केंद्राचा नवा दंडुका… हुर्ऱियतच्या दोन्ही गटांवर बंदी घालून कंबरडे मोडणार
- निर्वासितांच्या बुरख्याखाली दडलेले अफगाण दहशतवादी स्वीकारणार नाही… रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांचा अमेरिका व युरोपीय देशांना कडाडून विरोध