विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : डिझेलमुळे होणारे प्रदूषण पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. उद्योगांनी पर्यायी इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यासाठी संशोधन आणि विकास (आर अँड डी) वर खर्च केला पाहिजे. डिझेलवरील वाहनांचे उत्पादन बंद करा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.Nitin Gadkari’s appeal to companies to stop production of vehicles on diesel, find other alternatives
ऑटो उद्योगाची संघटना असलेल्या सियामच्या वार्षिकपरिषदेत बोलताना गडकरी म्हणाले की, सरकार फ्लेक्सिबल सिस्टमवाल्या इंजिनांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. ग्राहकांना 100% पेट्रोल किंवा 100% बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय देईल. मी वाहन उत्पादकांना डिझेल इंजिन वाहनांचे उत्पादन आणि विक्री थांबविण्याचे आवाहन करतो.
डिझेलमुळे होणारे प्रदूषण पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. उद्योगाने ए 20 ला अनुकूल वाहने जलद विकसित करण्याची अपेक्षा आहे. ए 20 वाहने म्हणजे इंधनात 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल यांचे मिश्रण असेल. यामुळे आयात बिल कमी होईल आणि पर्यावरण संरक्षणासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
सरकारला हवे आहे की, भारताच्या जीडीपीमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राचा वाटा सध्याच्या 7.1 टक्क्यांपेक्षा 12 टक्क्यांपर्यंत वाढला पाहिजे. रोजगाराच्या दृष्टीने या क्षेत्राचे योगदान सध्याच्या तीन कोटी ७० लाखांवरून पाच कोटींपर्यंत गेले पाहिजे.
गडकरी म्हणाले की, देशाला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यात ऑटोमोबाईल उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. आता भारतात अनेक बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह ब्रँड उपलब्ध आहेत आणि सरकार देशाला अव्वल जागतिक ऑटोमोबाईल उत्पादन केंद्र बनवण्यासाठी काम करत आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) वाहन क्षेत्राचे योगदान 7.1 टक्के आहे, तर उत्पादन क्षेत्राच्या जीडीपीमध्ये वाहन क्षेत्राचा वाटा 49 टक्के आहे. वाहन उद्योगाची वार्षिक उलाढाल 7.5 लाख कोटी रुपये आहे आणि निर्यात 3.5 लाख कोटी रुपये आहे.
Nitin Gadkari’s appeal to companies to stop production of vehicles on diesel, find other alternatives
महत्त्वाच्या बातम्या
- विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षाचे तालीबानी बोल, नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५१ लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा
- अनुराधा पौडवाल भाजपाच्या वाटेवर, उत्तराखंड निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांना बांधली राखी
- केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस यांना जीवे मारण्याची धमकी, अमित शहा आणि नितीशकुमार यांना पत्र लिहून केली सुरक्षा वाढविण्याची मागणी
- मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे २ सप्टेंबरला राष्ट्रपतींना भेटणार, महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या एका खासदाराला निमंत्रण