• Download App
    नितीन गडकरी यांना हे शहर बनवायचे आहे भारताचे स्वित्झर्लंड, स्केइंगसाठी जगभरातून येतील पर्यटक|Nitin Gadkari wants to make this city India's Switzerland, tourists from all over the world will come for skiing

    नितीन गडकरी यांना हे शहर बनवायचे आहे भारताचे स्वित्झर्लंड, स्केइंगसाठी जगभरातून येतील पर्यटक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : स्वित्झर्लंडच्या तोडीचे निसर्गसौंदर्य असूनही हिमालयातील अनेक ठिकाणे पर्यटकांपासून दूरच आहेत. यापैकी एक सुंदर शहर उत्तराखंड राज्यातील औली आहे. या शहराला स्केइंगसाठी स्वित्झर्लंडप्रमाणेच जगभरातील पर्यटकांचे आकर्षण बनावे यासाठी आता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कंबर कसली आहे.Nitin Gadkari wants to make this city India’s Switzerland, tourists from all over the world will come for skiing

    एका आभासी कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, बद्रीनाथ आणि केदारनाथ जवळील उत्तराखंडमधील औलीचाआम्हाला जगभरातील पर्यटकांचे आकर्षण म्हणून विकास करायचा आहे. उत्तराखंडमध्ये वसलेले हिल स्टेशन भारताचे स्केइंग रिसॉर्ट आहे.



    सुमारे २,8०० मीटर उंचीवर असलेले हे शहर ओकच्या जंगलांनी वेढलेले आहे. औली येथील स्केइंगचे उतार जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. त्याचबरोबर हिवाळ्यात या ठिकाणी बर्फातील अनेक साहसी खेळ खेळले जातात. याठिकाणाहून जगातील दुसºया क्रमांकाचे शिखर असलेल्या नंदादेवीचे विहंगम दृश्य दिसते.

    गडकरी म्हणाले, लडाखमधील झोजिला बोगदा आणि जम्मू-काश्मीरमधील झेड-मोर बोगद्यात स्वित्झर्लंडमधील जगप्रसिद्ध दावोस प्रमाणेच १८ किमी लांबीचा लँडस्केप विकसित करण्याचा विचार आहे. श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय महामार्गावर झोजिला पास ११,57878 फूट उंचीवर असून जोरदार हिमवृष्टीमुळे हिवाळ्यादरम्यान बंद राहतो.

    गडकरी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झोजिला बोगद्याच्या बांधकामाचे काम सुरू केले आहे. पुढील लोकसभा निवडणुकांपूर्वी श्रीनगर खोरे आणि लेह यांच्यात संपूर्ण वर्ष कनेक्टिव्हिटी देणारा धोरणात्मक प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला. या प्रकल्पाचे सहा वर्षांचे वेळापत्रक आहे. हा बोगदा आशियातील सर्वात लांब म्हणून ओळखला जाईल.

    गडकरी म्हणाले, देशात 60 हजार किमी लांबीचा जागतिक दर्जाचा महामार्ग बनविण्याचे माझे स्वप्न आहे. मला 2024 पर्यंत ते पूर्णही करायचे आहे. त्यासाठी, दिवसाला 40 किलोमीटर लांबीचा रस्ता बनिवण्यात येईल. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रस्ते दळणवळण हा अतिशय महत्त्वाचा भाग असून अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम या नेटवर्कमुळे शक्य होते.

    सरकारकडून 1.4 ट्रिलीयन डॉलर (111 लाख कोटी रुपये) नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनसाठी मंजूर करण्यात आले आहे. या क्षेत्रासाठी सरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्पात जवळपास 34 टक्क्यांनी वाढ करण्यात येते. यंदाही 5.34 लाख कोटी रुपयांचा भरीव निधी वाढवून देण्यात आला आहे.

    Nitin Gadkari wants to make this city India’s Switzerland, tourists from all over the world will come for skiing

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के