Covid 19 Vaccine : देशाला कोरोना संकटापासून वाचवण्यासाठी अधिकाधिक लसीकरण हा एक उत्तम उपाय असल्याचे म्हटले जात आहे. तथापि, देशातील बर्याच राज्यांना लसीचा तीव्र तुटवडा जाणवत आहे, ज्यामुळे केंद्राला टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर भाष्य केले आहे. देशातील इतर कंपन्यांनाही ही लस तयार करण्याचा परवाना देण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे. Nitin Gadkari Suggest Covid 19 Vaccine Manufactures Should Permit other domestic companies To Produce Vaccines
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाला कोरोना संकटापासून वाचवण्यासाठी अधिकाधिक लसीकरण हा एक उत्तम उपाय असल्याचे म्हटले जात आहे. तथापि, देशातील बर्याच राज्यांना लसीचा तीव्र तुटवडा जाणवत आहे, ज्यामुळे केंद्राला टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर भाष्य केले आहे. देशातील इतर कंपन्यांनाही ही लस तयार करण्याचा परवाना देण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
गडकरी म्हणाले की, लसीची मागणी वाढत असल्यास लस बनविण्याचा परवाना एका कंपनीऐवजी दहा कंपन्यांना देण्यात यावा. प्रथम या कंपन्यांनी भारतातच पुरवठा करावा आणि नंतर जर तो जास्त झाला तर आपण तो निर्यात करू शकतो. ते म्हणाले की, प्रत्येक राज्यात दोन ते तीन लॅब आहेत. त्यांना सेवा म्हणून नव्हे, तर 10 टक्के रॉयल्टीसह ही लस तयार करू द्या. हे 15-20 दिवसांत केले जाऊ शकते.
नितीन गडकरी यांनी अंत्यसंस्काराबद्दल काय म्हटले?
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांनी म्हटले की, ते प्रधानमंत्री आवास आणि शहर व्यवहार मंत्रालयाला मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी चांगली व्यवस्था करण्याचा प्रस्ताव देणार आहेत. ते म्हणाले की, जर चंदनाऐवजी डिझेल, इथेनॉल आणि बायोगॅस, वीज यासारख्या इंधनाचा वापर केला तर अंत्यसंस्कारांचा खर्च कमी होऊ शकतो.
ते म्हणाले, जेव्हा एखाद्यावर लाकडाचा वापर करून अंत्यसंस्कार केले जातात तेव्हा त्याची किंमत 3,000 रुपये असते. जर डिझेलचा वापर केला तर त्याची किंमत 1,600 रुपये, एलपीजीमध्ये 1,200 रुपये, इलेक्ट्रिकमध्ये 750-800 रुपये आणि बायोमास पॅलेट जाळल्यास 1000 रुपये किंमत आहे.
त्यांचा सल्ला अशा वेळी आला आहे, जेव्हा अलीकडेच बिहार आणि उत्तर प्रदेशात अंत्यसंस्कारासाठी जास्त पैसे आकारल्याच्या तक्रारी आल्या. यावेळी अनेक संशयित कोरोना रुग्णांचे मृतदेह नद्यांमध्ये वाहतानाही आढळले होते.
Nitin Gadkari Suggest Covid 19 Vaccine Manufactures Should Permit other domestic companies To Produce Vaccines
महत्त्वाच्या बातम्या
- Coronavirus Cases in India : भारतात सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांहून कमी रुग्ण, पहिल्यांदाच एका दिवसात 4529 मृत्यू
- आणखी एक लस : Sanofi GSK च्या कोरोनावरील लसीच्या तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलला लवकरच सुरुवात
- यूपी सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनाने निधन, PM मोदी आणि CM योगी आदित्यनाथंनी व्यक्त केला शोक
- Cyclone Tauktae : पीएम मोदी गुजरात-दीवच्या दौऱ्यावर, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा
- Israel Palestine Conflict : हमासच्या रॉकेट हल्ल्यांना इस्रायलचे एअरस्ट्राइकने उत्तर, 213 जणांचा मृत्यू, गाझाची एकमेव कोरोना टेस्टिंग लॅब नष्ट