• Download App
    उत्तर प्रदेशातील रस्ते अमेरिकेप्रमाणे बनविणार, आपले बोलणे काळ्या दगडावरची रेष असल्याचा नितीन गडकरी यांचा विश्वास|Nitin Gadkari believes his words are a line on a black stone to make roads in Uttar Pradesh like America

    उत्तर प्रदेशातील रस्ते अमेरिकेप्रमाणे बनविणार, आपले बोलणे काळ्या दगडावरची रेष असल्याचा नितीन गडकरी यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : पुढच्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशचे रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांसारखे बनवले जातील. माझे बोलणे काळ्या दगडावरची रेष आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.Nitin Gadkari believes his words are a line on a black stone to make roads in Uttar Pradesh like America

    नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी जौनपूरमध्ये एकूण १,१२३ कोटी रुपयांच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. नितीन गडकरी यांनी सोमवारी जौनपूर जिल्ह्यातील मच्छलीशहर येथील फौजदार इंटर कॉलेजमध्ये लोकांना संबोधित करताना म्हणाले, माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. येत्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशचे रस्ते युरोपीयन नाही तर अमेरिकेसारखे होतील.



    गडकरी म्हणाले, मी शेतकरी आहे. मी माझे आयुष्य शेतकºयांसाठी समर्पित केले आहे. माझ्या परिसरात दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून ही परिस्थिती बदलण्याचा मी निर्धार केला आहे. मी २००७ पासून म्हणत होतो की, आपल्या शेतकऱ्यांनी ऊर्जा पुरवठादार बनले पाहिजे, आज उत्तर प्रदेशचा शेतकरी साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल तयार करत आहेत.

    नितीन गडकरी म्हणाले की, आज मी घोषणा करतो की, येत्या तीन महिन्यांनंतर टोयोटा, सुझुकी, ह्युंदाई, मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू या सर्व गाड्या फ्लेक्स इंजिन बनवतील. फ्लेक्स इंजिन म्हणजे १०० टक्के पेट्रोल टाका किंवा १०० टक्के इथेनॉल टाकून वाहने धावतील. आता आमची वाहने पेट्रोलपासून नव्हे तर उत्तर प्रदेशातील शेतकºयांनी तयार केलेल्या बायो-इथेनॉलपासून चालतील. आता शेतकरी अन्नदाता नसून ऊजार्दाता होणार आहे.

    माझ्याकडे असे मंत्रालय आहे, जिथे पैशांची कमतरता नाही, असे सांगून गडकरी म्हणाले, राज्ये मागताना थकतील, पण देताना आपण थकणार नाही. तुम्ही पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे सरकार बनवा, येत्या पाच वर्षांत मी उत्तर प्रदेशात ५ लाख कोटींची कामे करून दाखवेन. मी त्या नेत्यांपैकी नाही जे पोकळ आश्वासनं देतात. गेल्या वर्षात जे मी बोललो ती सर्व कामे पूर्ण केलीत.

    Nitin Gadkari believes his words are a line on a black stone to make roads in Uttar Pradesh like America

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!