• Download App
    ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत भारतात कोरोना लसीचे 216 कोटी डोस असतील, सर्वांना मिळेल लस : नीती आयोग । Niti Ayog Member Dr VK Paul Says India will Have 216 Crore Doses Of Corona Vaccine Between August To December this Year

    डिसेंबरपर्यंत भारतात कोरोना लसीचे 216 कोटी डोस, कोणत्या कंपनीचे किती डोस मिळतील? वाचा सविस्तर

    Corona Vaccine : नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, भारतात कोरोना लसीचे सुमारे 18 कोटी डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेत ही संख्या सुमारे 26 कोटी आहे, तर भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. अनेक राज्यांमध्ये कोविड लस नसल्याच्या तक्रारीनंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी येत्या चार महिन्यांकरिता त्यांची उत्पादन योजना केंद्र सरकारकडे सादर केली. कंपन्यांनी म्हटले आहे की, ऑगस्टपर्यंत त्यांचे उत्पादन 10 कोटी (सीरम) आणि 7.8 कोटीपर्यंत वाढणार आहेत. Niti Ayog Member Dr VK Paul Says India will Have 216 Crore Doses Of Corona Vaccine Between August To December this Year


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, भारतात कोरोना लसीचे सुमारे 18 कोटी डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेत ही संख्या सुमारे 26 कोटी आहे, तर भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. अनेक राज्यांमध्ये कोविड लस नसल्याच्या तक्रारीनंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी येत्या चार महिन्यांकरिता त्यांची उत्पादन योजना केंद्र सरकारकडे सादर केली. कंपन्यांनी म्हटले आहे की, ऑगस्टपर्यंत त्यांचे उत्पादन 10 कोटी (सीरम) आणि 7.8 कोटीपर्यंत वाढणार आहेत.

    डॉ. व्ही. के. पॉल यांनी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत भारतात कोरोना लसीचे किती डोस उपलब्ध असतील याची संपूर्ण माहिती दिली आहे. पॉल यांनी बुधवारी म्हटले भारतात कोव्हिशील्डच्या 75 कोटी डोस, कोव्हॅक्सिनचे 55 कोटी डोस, बायो व्हॅक्सिनचे 21 कोटी डोस, झायडस व्हॅक्सिनचे 5 कोटी डोस, नोव्हाव्हॅक्स व्हॅक्सिनचे 20 कोटी डोस, गेन्नोव्हा व्हॅक्सिनचे 6 कोटी डोस आणि स्पुतनिक व्हॅक्सिनचे 15 कोटी डोस उपलब्ध होतील. अशाप्रकारे आपल्याकडे ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान कोरोनावरील आठ लसींचे मिळून 216 कोटी डोस असतील.

    कोणत्या लसीचे किती डोस असतील?

    कोव्हिशील्ड – 75 कोटी डोस
    ऑक्सफोर्ड विद्यापीठाने अ‍ॅस्ट्राझेनेका या औषधी कंपनीबरोबर मिळून ही लस तयार केली आहे. भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट याची निर्मिती आणि प्रायोगिक भागीदार आहे.

    कोव्हॅक्सिन – 55 कोटी डोस
    भारतातील पहिली स्वदेशी कोरोना लस म्हणजे कोव्हॅक्सिन आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबादेतील भारत बायोटेकने या लसीची निर्मिती केली आहे.

    बायो व्हॅक्सिन – 21 कोटी डोस
    HDT Bio Corp ही अमेरिकन कंपनी भारतात जिनिव्हा बायो फार्मास्युटिकल कंपनीच्या सहकार्याने या लसीची निर्मिती करत आहे.

    झायडस कॅडिला व्हॅक्सिन – 5 कोटी डोस
    अहमदाबादमधील झायडस कॅडिलाच्या प्रयोगशाळेत ही लस तयार केली जात आहे.

    नोव्हावॅक्स व्हॅक्सिन – 20 दशलक्ष डोस
    सीरम इन्स्टिट्यूटने अमेरिकी औषध कंपनी नोव्हाव्हॅक्स इंकसोबत मिळून या लसीचे उत्पादन व वितरणासाठी करार केला आहे.

    जीनिव्हा व्हॅक्सिन – 6 कोटी डोस
    अमेरिकन कंपनी HDT Bio Corp भारतात जीनिव्हा फार्मास्युटिकल कंपनीसोबत ही लसही बनवत आहे.

    स्पुतनिक व्हॅक्सिन – 15 कोटी डोस
    मॉस्कोच्या गामालय संस्थेने रशियन डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट फंडसोबत मिळून या लसीची निर्मिती केली आहे.

    लवकरच स्पुतनिक लसीचा पुरवठा सुरू होणार

    नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी असेही म्हटले की, स्पुतनिक लसीचा पुरवठा पुढील आठवड्यापासून सुरू होईल. जुलैपासून त्याचे उत्पादन भारतात सुरू होईल. ते म्हणाले, “स्पुतनिक लस भारतात आली आहे. आम्ही आशा करतो की ती पुढील आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होईल. रशियाकडून मर्यादित प्रमाणात लसीची विक्री येत्या आठवड्यापासून सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. ही लस सर्वांना उपलब्ध असेल आणि त्याबद्दल कोणीही शंका घेऊ नये, असे ते म्हणाले.

    Niti Ayog Member Dr VK Paul Says India will Have 216 Crore Doses Of Corona Vaccine Between August To December this Year

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    IMF board : भारताने IMF बोर्डातून कार्यकारी संचालकांना काढून टाकले; 6 महिने कार्यकाळ शिल्लक होता

    Waqf Act : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वक्फ कायद्याच्या विरोधात; हैदराबादेत ‘वक्फ बचाओ, संविधान बचाओ’ मोहीम

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती; 80च्या दशकातील काँग्रेसच्या चुकांची जबाबदारी घेण्यास तयार