Niti Aayog Member Dr VK Paul : देशात कोरोनाची संसर्गामुळे रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय की, आता लोकांनी घरीसुद्धा मास्क घालण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले की, जर कुटुंबातील एखादा कोरोना संसर्गग्रस्त आढळला असेल तर त्यालाही मास्क लावावा आणि रुग्णाला दुसर्या खोलीत ठेवावे. Niti Aayog Member Dr VK Paul Says, Now its time to Wear mask at home
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोनाची संसर्गामुळे रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय की, आता लोकांनी घरीसुद्धा मास्क घालण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले की, जर कुटुंबातील एखादा कोरोना संसर्गग्रस्त आढळला असेल तर त्यालाही मास्क लावावा आणि रुग्णाला दुसर्या खोलीत ठेवावे.
डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले की, या महामारीला पराभूत करण्यासाठी आपल्याला लसीकरण गतीने पुढे न्यायाचे आहे. लसीकरणाची गती कमी करून चालणार नाही. ते म्हणाले की, या कोरोना परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीने अनावश्यक बाहेर फिरू नये. कुटुंबासमवेत असतानाही मास्क घालावा. ते म्हणाले की, मास्क घालणे फार महत्त्वाचे आहे. फारच निकडचे नसेल तर इतरांना आपल्या घरीही बोलावू नका.
महिलांना पीरियडदरम्यानही लस दिली जाऊ शकते
डॉ. व्ही के पॉल म्हणाले की, या भयंकर उद्रेकादरम्यान आपण कोरोना लसीकरणाची गती कमी करू शकत नाही. खरं तर लसीकरण मोहीम वेगाने वाढवली पाहिजे. यासह त्यांनी असेही म्हटले की, या लसी महिला मासिक पाळीच्या दरम्यान घेऊ शकतात. केवळ त्यामुळे लस घेणे पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण नाही.
Niti Aayog Member Dr VK Paul Says, Now its time to Wear mask at home
महत्त्वाच्या बातम्या
- सरन्यायाधीशांच्या नावे बनावट ट्विटर अकाउंट, जस्टिस रमना यांच्या पोलिसांत तक्रारीनंतर ट्वीटरनेही केली कारवाई
- लसींचे दर कमी करण्याबाबत केंद्राची सीरम व भारत बायोटेकला विचारणा, 1 मेपासून सुरू होणार तिसरा टप्पा
- India Fights Back : सैन्यातील निवृत्त मेडिकल ऑफिसर्सही कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मैदानात, CDS रावत यांची PM मोदींना माहिती
- जिंकलंस भावा! : ऑस्ट्रेलियन खेळाडूची पीएम केअर्समध्ये 50 हजार डॉलर्सची मदत, भारतीय सेलिब्रिटी मात्र टीका करण्यातच धन्य
- कृषिमंत्री दादाजी भुसेंच्या मुलाचे खा. विचारेंच्या मुलीशी लग्न, सत्ताधाऱ्यांनीच कोरोना नियमावलीला हरताळ फासल्याची चर्चा!