विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात विमान वाहतुकीचे स्वप्न पाहत टाटा गु्रपने ९० वर्षांपूर्वी हवाई वाहतूक कंपनीची स्थापना केली. मात्र, कॉँग्रेसच्या सरकारने त्यांची एअरलाईनच ताब्यात घेतली. तब्बल ९० वर्षांनंतर ही कंपनी पुन्हा टाटांच्या ताब्यात जाणार आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला १८ हजार कोटी रुपये मोजले आहेत.Ninety years later, Air India is back in Tata’s hands, soon to be transferred
मागील वर्षी ८ ऑक्टोबर रोजी सरकारने टाटा समुहातील टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडला एअर इंडिया १८ हजार कोटी रुपयांना विकली आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबरला टाटा समुहाला एक पत्र जारी करण्यात आलं होतं. त्या पत्रात सरकारकडून एअर लाईन्समधील 100 टक्के भागिदारी विकण्याची इच्छा व्यक्त केली होती.
२५ आॅक्टोबर रोजी केंद्रानं शेअर खरेदी करार केला. पुढील काही दिवसांत सगळी औपचारिकता पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि चालू आठवड्याच्या अखेरिस एअर इंडिया टाटा समुहाकडे सोपवली जाईल. चालू आठवड्यात सर्व प्रक्रिया पार पडण्यासाठी २४ तास काम सुरु आहे.
जवळपास 68 वर्षांनंतर तोट्यात चालणारी सरकारी विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाच्या मालकीची झाली आहे. एअर इंडियासाठी टाटा समूह आणि स्पाईसजेटच्या अजय सिंग यांनी बोली लावली होती. टाटा सन्सने एअर इंडियासाठी 18 हजार कोटी रुपयांची बोली जिंकली. विशेष म्हणजे रतन टाटांनीही ट्विट करत यावर भाष्य केलं होतं.
टाटा समूहाच्या ताब्यात पुन्हा एकदा एअर इंडिया आली, ही एक चांगली बातमी आहे. आता एअर इंडियाला पुन्हा उभे करण्यासाठी प्रचंड मेहनत खर्ची करावी लागणार आहे. तसेच विमान उद्योगात टाटा समूहाला एअर इंडियाच्या माध्यमातून एक चांगली संधी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचंही टाटांनी ट्विट करत सांगितलं होतं.
जेआरडी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने एकेकाळी जगातील सर्वात प्रतिष्ठित विमान कंपन्यांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला होता. आधीच्या वर्षांमध्ये मिळालेली प्रतिमा आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची संधी टाटाला मिळेल. जेआरडी टाटा आज आमच्यामध्ये असते, तर त्यांना खूप आनंद झाला असत, असंही टाटांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस म्हणून झाली होती, ज्याचे नंतर टाटा एअरलाईन्स असे तिचे नामकरण करण्यात आले. भारतीय व्यावसायिक असलेल्या जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटाने इंपिरियल एअरवेजसाठी मेल घेऊन जाण्याचा करार जिंकला.
यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटाने कराचीहून मुंबईला हवाई मेल विमान उड्डाण केले. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली,
जी कराची आणि मद्रासदरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली. पुढील वर्षात विमान कंपनीने 2,60,000 किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी 155 प्रवाशांनी प्रवास केला आणि 9.72 टन मेल आणि 60,000 रुपयांचा नफा मिळवला.
Ninety years later, Air India is back in Tata’s hands, soon to be transferred
महत्त्वाच्या बातम्या
- शासकीय वसतीगृहाचा वापर तात्पुरत्या कारागृहासाठी
- महाराष्ट्राच्या चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’साठी निवड पंतप्रधानांनी बालकांशी संवाद साधला
- सहकार सम्राटांविरुध्द अण्णा हजारे यांचा एल्गार, सहकार साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप, अमित शहांना लिहिले पत्र
- पेण : शिर्की चाळ नंबर 2 येथील सागरवाडीत शॉर्टसर्कीटमुळे आग , संपूर्ण घर जळून खाक