विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू- काश्मीररमधील हवाई तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करणार आहे. लष्करी तळावर अशाप्रकारचा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. NIA will enquire Drone attack
या हल्ल्यासाठी आरडीएक्सचे मिश्रण वापरण्यात आले असावे, असा संशय तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान हे ड्रोन नेमक्या कोणत्या दिशेने हवाई तळावर आले याचा शोध घेतला जात आहे. जम्मूतील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मी रमधील लष्करी तळांभोवतीच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान जम्मूतील लष्करी तळावरील ड्रोन हल्ल्याचा कट लष्कराने उधळून लावल्यानंतर पुन्हा या भागामध्ये एक ड्रोन घिरट्या घालताना दिसले. त्यामुळे सुरक्षा व्यवस् रातनूचक-कुंजवानी परिसरामध्ये मध्यरात्री हे ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले आहे. रातनूचक भागामध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास तर कुंजवानी भागामध्ये पहाटे तीन आणि चारच्या सुमारास हे ड्रोन घिरट्या घालताना दिसून आले.
NIA will enquire Drone attack
महत्त्वाच्या बातम्या
- इस्रोची पहिली मानवविरहित अंतराळ मोहिम डिसेंबरमध्ये, कामाला वेग
- दहशतवाद्यांकडून हल्ल्यांसाठी ड्रोनचा वाढता वापर, भारताकडून आमसभेत चिंता
- कर्नाटकात जुलै महिन्यात दहावीच्या परीक्षा, तारखा जाहीर
- कोरोनाचा संसर्ग आता जंगलातही पोहोचला, चार नक्षलवाद्यांचा मृत्यू
- जगभरातील ५० पेक्षाही अधिक देश भारताचे ‘को-विन’ वापरण्यासाठी उत्सुक