• Download App
    सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय दूतावासावरील खलिस्तानी हल्लाप्रकरणी NIAचे पथक अमेरिकेला जाणार! NIA team will go to America in case of Khalistani attack on Indian Embassy in San Francisco

    सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय दूतावासावरील खलिस्तानी हल्लाप्रकरणी NIAचे पथक अमेरिकेला जाणार!

    (संग्रहित)

    17 जुलैनंतर NIAची टीम पाच दिवसांसाठी सॅन फ्रान्सिस्कोला जाणार आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तानी हल्ल्याप्रकरणी NIAचे पथक अमेरिकेला जाणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे.  17 जुलैनंतर NIAची टीम पाच दिवसांसाठी सॅन फ्रान्सिस्कोला जाणार आहे. गृहमंत्रालयाने NIA ला अमेरिकेत जाण्याची परवानगी दिली आहे. NIA team will go to America in case of Khalistani attack on Indian Embassy in San Francisco

    NIAच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलैनंतर एनआयएची पाच सदस्यीय टीम अमेरिका सॅन फ्रान्सिस्कोला जाईल, जिथे NIA वाणिज्य दूतावासातील हल्ल्याची चौकशी करेल. काही दिवस अगोदर, अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासात झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाच्या तपासावर NIAने FIRही नोंदवला आहे. यासोबतच कॅनडातील भारतीय दूतावासावर शीख फॉर जस्टिस आणि इतर संघटनांनी केलेल्या हल्ल्याचा तपासही NIAने ताब्यात घेतला आहे. या दोन्ही हल्ल्यांचा तपास गृह मंत्रालयाने NIAकडे सोपवला होता.

    2 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्को येथील वाणिज्य दूतावास जाळण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाचीही एनआयए चौकशी करणार असल्याचे मानले जात आहे. या सगळ्यामागचा हेतू असा आहे की खलिस्तानी संघटना आयएसआयच्या सांगण्यावरून भारतीय दूतावास आणि तेथील अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे, भारतीय सुरक्षा यंत्रणांनीही त्यांना लगाम घालण्याची पूर्ण तयारी केली आहे.

    NIA team will go to America in case of Khalistani attack on Indian Embassy in San Francisco

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!