• Download App
    जम्मूत स्फोट घडवून आणण्याचा कट, श्रीनगरसह काश्मी रमध्ये ‘एनआयए’चे छापेसत्र सुरूच|NIA raids in Shrinager

    जम्मूत स्फोट घडवून आणण्याचा कट, श्रीनगरसह काश्मी रमध्ये ‘एनआयए’चे छापेसत्र सुरूच

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर – एनआयएने श्रीनगर व काश्मी रमधील इतर भागात मंगळवारी सकाळी छापे घातले. दहशतवादी संघटना व देशविरोधी काम करणाऱ्यांना पैसा पुरविणे आणि जम्मूत स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आल्याच्या माहितीवरून हे छापे घालण्यात आले.NIA raids in Shrinager

    श्रीनगरमधील मोहमंद शफी वणी याच्या घरात ‘एनआयए’ने झडती घेतली. त्यावेळी शफी व त्याचा मुलगा रईस वणी यांचे मोबाईल फोन जप्त केले. शफी याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी त्याला पंथा चौक पोलिस स्थानकात नेले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.



    कुलगाम येथील लार्म गजीपुरा गावात राहणाऱ्या वसीम अहमद दर याच्या घराचीही ‘एनआयए’च्या पथकाने झडती घेतली. अनंतनागमधील बामनू सादीवार येथील बशीर अहमद पद्दर याच्या घरावर छापा घातला. पद्दर हा त्या भागाचा पंच आहे. गुरांची चोरटा व्यापार तो करतो.

    डुरू येथे शाकिर अहमद भट याच्या घराचीही ‘एनआयए’ने झडती घेतली. उत्तर काश्मीकरमधील बारामुल्लाजवळील जंदफरान शीर येथील गुलाम मोहिउद्दीन वणी याच्या घराचीही तपासणी करण्यात आली.

    वणी हा रेशीमपालन विभागात कार्यरत आहे. या छापेसत्रात ‘एनआयए’ला जम्मू-काश्मीार पोलिस व केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) सहकार्य केले.

    NIA raids in Shrinager

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही