वृत्तसंस्था
नवी दिल्ली – दहशतवाद्यांना पैसे पुरविण्यात आल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जम्मू-काश्मीरमधील १४ जिल्ह्यांतील ४० ठिकाणी छापे घातले.बंदी घालण्यात आलेल्या जमाते इस्लामी या संघटनेच्या नेत्यांच्या ठिकाणांवर हे छापे घालण्यात आले आहेत.NIA conducts raids in J and K
जम्मू काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या मदतीने एनआयएने दोडा, किश्तवाड, रामबन, अनंतनाग, बडगाम, राजौरी, शोपियाँ यासह इतर ठिकाणी कारवाई केली आहे.दहशतवाद्यांना मदत केल्या प्रकरणी गेल्या महिन्यात दहा जुलै रोजी एनआयएने सहा जणांना अटक केली होती.
याच प्रकरणी जम्मू-काश्मीर सरकारमधील सहा कर्मचाऱ्यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सईद सलाहुद्दीन याच्या मुलाचाही समावेश आहे.
गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्रालायाने जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी जमाते इस्लामीच्या वाढत्या प्रभावावरही चर्चा करण्यात आली होती. या संघटनेवर २०१९मध्ये बंदी घालण्यात होती. तरीही त्या संघटनेच्या नेत्यांच्या लपून-छपून कारवाया सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलांना याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
NIA conducts raids in J and K
महत्वाच्या बातम्या
- कोविन अॅप जबरदस्त, कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केले मोदी सरकारचे कौतुक
- महापुराच्या मदतीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, लाँगटर्म योजना करत आहोत, काही वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल !
- केंद्र सरकारने आरक्षणाची 50 टक्क्यांची अट शिथिल करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी
- पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत open debate; रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख सहभागी होणार