Railway Minister Ashwini Vaishnav : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नवीन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिपदावर येताच मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या कामाचे तास बदलले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी कर्मचार्यांना दोन शिफ्टमध्ये काम करण्याचे आदेश दिले आहेत. पहिली शिफ्ट सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 4 वाजता संपेल, तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 12 वाजता संपेल. याव्यतिरिक्त माजी सनदी अधिकारी अश्विनी वैष्णव रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यावरही चर्चा करत आहेत. New Railway Minister Ashwini Vaishnav changed the time of working in the ministry, now work will be done in two shifts
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नवीन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिपदावर येताच मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या कामाचे तास बदलले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी कर्मचार्यांना दोन शिफ्टमध्ये काम करण्याचे आदेश दिले आहेत. पहिली शिफ्ट सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 4 वाजता संपेल, तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 12 वाजता संपेल. याव्यतिरिक्त माजी सनदी अधिकारी अश्विनी वैष्णव रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यावरही चर्चा करत आहेत.
रेल्वे मंत्रालयाचे एडीजी पीआर डीजे नारायण यांच्या म्हणण्यानुसार हा आदेश केवळ एमआर सेल (मंत्री कार्यालय) यांना देण्यात आला आहे, खासगी किंवा रेल्वे कर्मचार्यांना नाही. नारायण म्हणाले, “रेल्वेमंत्र्यांनी मंत्री कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीच्या प्रभावाने सकाळी 7 ते संध्याकाळी 4 आणि दुपारी 3 ते 12 या वेळेत दोन शिफ्टमध्ये काम करतील, असे निर्देश दिले आहेत.”
अश्विनी वैष्णव यांनी भारतीय नवे आयटी मंत्री आणि रेल्वेमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. ओडिशा येथील राज्यसभेच्या खासदार अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. त्यांनी संचार मंत्रालयाचाही कार्यभार स्वीकारला आहे. वैष्णव यांनी दोन्ही मंत्रालयात रविशंकर प्रसाद यांचे स्थान घेतले. प्रसाद 2019 पासून संचार विभाग सांभाळत होते, तर 2016 पासून त्यांच्याकडे आयटी मंत्रालय होते.
1994च्या तुकडीचे माजी आयएएस अधिकारी वैष्णव यांनी गत 15 वर्षांत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत आणि विशेषत: पीपीपीच्या चौकटीत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ओळखले जाते. त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील व्हार्टन स्कूल व एमटेक पदवी आयआयटी कानपूर येथून प्राप्त केली आहे. जनरल इलेक्ट्रिक आणि सीमेन्स यासारख्या प्रमुख जागतिक कंपन्यांमध्ये वैष्णव यांनी नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
New Railway Minister Ashwini Vaishnav changed the time of working in the ministry, now work will be done in two shifts
महत्त्वाच्या बातम्या
- एसबीआयच्या ग्राहकांनो सावधान, चीनी हॅकर्सकडून केवायसीच्या नावाखाली होतेय फसवणूक
- धोका संपला नाही, आता केरळमध्ये झिका विषाणूचा शिरकाव; डासांना रोखा
- गब्बर चित्रपटातील स्टोरी इस्लामपूरमध्ये प्रत्यक्षात घडली, पैशासाठी मृत रुग्णाला जीवंत दाखवून डॉक्टर करत होता उपचार
- रामविलास पास्वान यांचा राजकीय उत्तराधिकारी मीच, पशुपती कुमार पारस यांनी पुतण्या चिराग पासवानला सुनावले
- निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करणारे नितीन राऊत यांचे पत्र उध्दव ठाकरे यांनी कचरापेटीत टाकले