विशेष प्रतिनिधी
जयपूर : जिल्हा प्रशासनाला पूर्व सूचना न देता विवाह करणाऱ्या आणि क्वारंटाइनचे नियम न पाळणाऱ्या नवरदेवाला चक्क एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. चितोडगड जिल्ह्यातील भूपालसागर येथे ही घडला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला.New married man gets fine of one lack
चितोडगडच्या भूपालसागर भागात अंकित यांचा विवाह निश्चिथत झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याच्यासह अन्य दोघांना कोरोनाची बाधा झाली होती. अर्थात दुसऱ्यांदा तपासणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला.
त्यानंतर शुक्रवारी नवरदेव आणि त्याचे वऱ्हाड छोटीसादडी तहसीलतंर्गत मानपुरा गावात विवाहासाठी गेले. तेथे या तीन जणांनी क्वारंटाइनचा नियम पाळला नाही. हे कळताच तहसीलदारांनी एक लाखाचा दंड आकारला.
नवरदेव आणि वऱ्हाडींनी चौदा दिवसांचा क्वारंटाइनचा नियम पाळला नाही. तसेच विवाहाची पूर्वसूचनाही दिली नव्हती. एक लाखाचा दंड आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर महिलांनी आमच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. तेव्हा तहसीलदारांनी क्वारंटाइनचा नियम न पाळल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
New married man gets fine of one lack