विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ट्विटरने अखेर भारताच्या कायद्याला मानून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. भारताच्या नवीन सोशल मीडिया आणि मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वांनुसार बंधनकारक असलेला तक्रारी निवारण अहवाल दाखल केला आहे.New Indian law implemented by Twitter, 133 posts deleted, 18,000 accounts suspended
छळवणूक आणि गोपनियतेचा उल्लंघन करणाºया १३३ पोस्टवर कारवाई केली आहे. त्याचबरोबर पोर्नोग्राफीच्या तक्रारीवरून १८ हजार अकाऊंटस निलंबित करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने नव्याने केलेल्या कायद्याविरोधात ट्विटरने संघर्षाची भूमिका घेतली होती. मात्र, न्यायालयानेही ट्विटरला फटकारल्यानंतर भारतीय कायदे मानण्यास सुरूवात केली आहे. विनय प्रकाश यांची भारतात तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
२५ मे ते २६ जून या कालावधीसाठी केलेल्या कार्यवाहीबाबतच्या या अहवालात म्हटले आहे की, ट्विटर खाते निलंबनासाठी अपील करणाºया ५६ तक्रारींवर कार्यवाही सुरू केली आहे. फेसबुक आणि गुगलनंतर ट्विटरनेही आता सरकारी नियम पाळण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार आता अहवाल प्रसिध्द करण्यास सुरूवात केली आहे.
२६ मे पासून अंमलात आलेल्या नवीन आयटी नियमानुसार, सोशल मीडिय कंपन्यांनी मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी आणि तक्रार अधिकारी या तीन मुख्य अधिकाऱ्यांची नेमणूक करायची आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही अधिकारी भारताचे रहिवासी असले पाहिजेत.
ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की आता नोडल व अनुपालन अधिकारी यांच्या व्यतिरिक्त त्यांनी अंतरिम तक्रार निवारण अधिकारी नेमला आहे. दर महिन्याला मासिक अनुपालन अहवाल प्रकाशित करेल ज्यामध्ये तक्रार यंत्रणेद्वारे केलेल्या कारवाईचा आणि वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारींचा तपशील समाविष्ट असेल.
त्यानुसार पहिल्या अहवालात ट्विटरने म्हटले आहे की, मुलांच्या लैंगिक शोषणाची 18,385 खाती आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी 4,179 खाती निलंबित करण्यात आली आहे.गेल्या आठवड्यात फेसबुकने भारताच्या नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांतर्गत प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात 15 मे ते 15 जून दरम्यानच्या पोस्ट्स आणि प्रोफाइलच्या पृष्ठांसह 30 दशलक्षांहून अधिक सामग्री काढल्याचे म्हटले आहे.
हिंसाचार, नग्नता, लैंगिक क्रियाकलाप,आत्महत्या, स्वत:स दुखापत करून घेणाऱ्या पोस्टचा समावेश आहे. कंपनी आणखी एक अहवाल 15 जुलै रोजी प्रकाशित करणार असल्याचे सांगितले.
New Indian law implemented by Twitter, 133 posts deleted, 18,000 accounts suspended
महत्त्वाच्या बातम्या
- समाजवादी पक्षाच्या खासदाराचे अजब तर्कट, लोकसंख्या नियंत्रित झाल्यास युध्दासाठी मनुष्यबळ कसे मिळणार?
- Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!
- लसीकरण झालेले नाही, तिसरी लाट तोंडावर; शाळा सुरू करण्यास आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रतिकूल
- Population control : देशाच्या शाश्वत प्रगतीसाठी लोकसंख्या नियंत्रण आवश्यक; पवारांनी मांडली भूमिका, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन