• Download App
    महत्त्वाची बातमी : देशात कोविड लक्षणं सदृश नव्या फ्लूचा साथ; नागरिकांसाठी केंद्राकडून मार्गदर्शक सूचना New flu with covid symptoms in the country Guidelines from the Center for Citizens

    महत्त्वाची बातमी : देशात कोविड लक्षणं सदृश नव्या फ्लूची साथ; नागरिकांसाठी केंद्राकडून मार्गदर्शक सूचना

    (संग्रहित छायाचित्र)

    दिल्लीसह देशभरातली अन्य भागात इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

    विशेष प्रतिनिधी

    करोना महामारीचे संकट देशावरून अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. कारण, देशभरात आता मागील दोन-तीन महिन्यांपासून कोविड लक्षणं सदृश अशा नव्या फ्लूची साथ पसरत आहे. राजधानी दिल्लीसह देशभरातली अन्य भागात इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. करोना सारखीच लक्षणे रूग्णांमध्ये दिसत आहेत. हा फ्लूचाच एक प्रकार असल्याचे आणि ‘फ्लू ए’चा उपप्रकार ‘एच३एन२’ या विषाणूमुळे त्याचा प्रादुर्भाव होत असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. सातत्याने खोकला आणि ताप ही या आजाराची प्रमुख लक्षणे असल्याचे सांगण्यात आले आहे. New flu with covid symptoms in the country Guidelines from the Center for Citizens


    भारत २०२६ पर्यंत ३०० अब्ज डॉलर्सच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणार – राजीव चंद्रशेखर


    या नव्या फ्लूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर ‘आयसीएमआर’, ‘आयएमए’च्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  प्रतिजैवकांचा वापर करू नये आणि डॉक्टरांनी सध्या फक्त लक्षणांवर औषधे द्यावीत असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिला आहे. हा हंगामी ताप पाच ते सात दिवस येतो, असेही ‘आयएमए’ने स्पष्ट केले. हा ताप तीन दिवसांनी जातो, तर खोकला मात्र तीन आठवडय़ांपर्यंत राहू शकतो, असे ‘आयएमए’च्या समितीने सांगितले.

    IMA सल्ला- बॅक्टेरियाविरोधी औषधे वापरणे टाळा

    इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने लोकांना सर्दी, फ्लू, ताप आणि मळमळ यांसाठी मनानेच अँटीबायोटिक्स न घेण्याचा सल्ला दिला आहे. असोसिएशनने डॉक्टरांना रुग्णांची लक्षणे पाहूनच उपचार करण्यास सांगितले आहे.

    या आजाराची लक्षणे  –

    फ्लूच्या इतर उपप्रकारांपेक्षा ‘एच३एन२’मुळे रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्दी, खोकला आणि तापाबरोबरच मळमळ, उलटय़ा, घसादुखी, अंगदुखी, अतिसार ही या आजाराची अन्य लक्षणे आहेत.

    नागरिकांसाठी सूचना काय? –

    हात नियमितपणे साबण आणि पाण्याने धुवावेत. मुखपट्टीचा वापर करावा, गर्दीची ठिकाणे टाळावीत, नाक आणि तोंडाला हात लावणे टाळावे. खोकताना, शिंकताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाकावे, पाणी पीत राहावे, भरपूर द्रवपदार्थाचे सेवन करावे , ताप आणि अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घ्यावी.

    काय काळजी घ्यावी –

    हस्तांदोलन करू नये, स्पर्श टाळावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, स्वत:हून औषधे घेऊ नयेत, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रतिजैवके आणि इतर औषधे घ्यावीत, इतरांच्या अगदी जवळ बसून खाणे टाळावे.

    New flu with covid symptoms in the country Guidelines from the Center for Citizens

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Lucknow High Court : लखनऊ हायकोर्टाने केंद्राला म्हटले- राहुल ब्रिटिश आहेत की नाही, 10 दिवसांत रिपोर्ट द्या!

    Iqbal Singh : भाजपचे इक्बाल सिंग दिल्लीचे नवे महापौर होणार; ‘आप’ निवडणुकीपासून दूर

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये ढगफुटी, श्रीनगर महामार्ग 20 फूट चिखल, शेकडो वाहने अडकली