‘’नरेंद्र मोदींनी २०२२ मध्ये आणलेल्या शैक्षणिक धोरणाला कोणीही विरोध करू शकत नाही किंवा आरोप करू शकत नाही.’’ असंही सांगितलं.
विशेष प्रतिनिधी
गांधीनगर : देशात नवीन शैक्षणिक धोरण लवकरच लागू होणार आहे, तरुणांना जागतिक नागरिक बनवण्याच्या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरण लवकरच लागू केले जाईल. परिपूर्ण मनुष्यस बनवणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असून, नवीन शैक्षणिक धोरण तेच करेल. सोप्या शब्दांत नवीन पिढीला जागतिक नागरिक बनवणे हे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.’’ अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल (रविवार) दिली. गुजरात केंद्रीय विद्यापीठाच्या चौथ्या दीक्षांत समारंभात पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. New Education Policy will be implemented soon Amit Shah in Gujarat
आजपासून पोषण पंधरवडा : केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम, काय आहे उद्दिष्ट??
यावेळी अमित शहा म्हणाले, ‘’नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वांनी स्वीकारले आहे आणि संपूर्ण देश त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. NEP 2020 शिक्षणाला संकुचित विचारांच्या कक्षेतून बाहेर काढण्यासाठी काम करेल. सर्वसाधारणपणे, शैक्षणिक धोरणांचा इतिहास वादात सापडला आहे. यापूर्वी दोन एनईपी आणण्यात आल्या होत्या आणि त्या नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. दुर्दैवाने आपल्या शिक्षण धोरणाला विचारधारेशी जोडण्याची आणि त्या विचारसरणीच्या साच्यात बदल करण्याची परंपरा आहे.’’
याचबरोबर,’’परंतु नरेंद्र मोदींनी २०२२ मध्ये आणलेल्या शैक्षणिक धोरणाला कोणीही विरोध करू शकत नाही किंवा आरोप करू शकत नाही. एकप्रकारे, संपूर्ण समाजाने ते स्वीकारले आहे आणि संपूर्ण देश त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे जात आहे.’’ असं त्यांनी सांगितलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक दिवस आधी बडोदाच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या ७१ व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित केले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा अभ्यास करण्यास सांगितले. त्याचवेळी विद्यार्थ्यांना हिंदीत संबोधित करताना, ‘’तुम्ही आयुष्यात काहीही करा, मातृभाषा कधीही सोडू नका.’’ असाही सल्ला दिला.
New Education Policy will be implemented soon Amit Shah in Gujarat
महत्वाच्या बातम्या
- राहुलजींचा टीआरपी घसरलाय का??; सावरकर समझा क्या…, राहुल गांधींचा फोटो शेअर करत काँग्रेसने डिवचले!!
- सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले, पण उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी गद्दारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात
- महाविकास आघाडी टिकवण्यासाठी छगन भुजबळांची क्लुप्ती; म्हणाले, मला शरदराव ठाकरे आवडतात!!
- मशिदींची मुजोरी संपवा!!; राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर