• Download App
    अमेरिकेत कोरोनावरील औषधाच्या दिशेने नवे आश्वासक पाउल। New Drug will impactful against corona

    अमेरिकेत कोरोनावरील औषधाच्या दिशेने नवे आश्वासक पाउल

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : दोन प्रकारच्या प्रतिपिंडांचा वापर करून केलेले उपचार कोरोनाविरोधात प्रभावी ठरत असल्याचे उंदरावरील संशोधनात दिसून आले आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी वेगवेळ्या प्रकारे प्रतिपिंड एकत्र करून कोरोना विषाणूविरोधात त्याची चाचणी घेतली असून तयार होणारे औषध उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. New Drug will impactful against corona



    दोन प्रतिपिंडांचा वापर करून तयार केलेले औषध उपयुक्त असून ते कोरोना विषाणूचा प्रभाव नष्ट करते, असे प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत उंदरांवर प्रयोग केले. कोरोना विषाणूच्या आतापर्यंत आढळून आलेल्या सर्व प्रकारांवर हे औषध उपयुक्त ठरत आहेत. प्रयोगशाळेत तयार केलेली प्रतिपिंडे ही शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या प्रतिपिंडांप्रमाणेच असतात.

    शास्त्रज्ञांनी अल्फा, बिटा, गॅमा आणि डेल्टा या कोरोना विषाणूच्या प्रकारांची चाचणी घेतली. त्यानंतर त्यांनी उंदरांमध्ये निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडांचा अभ्यास केला. शास्त्रज्ञांनी उंदरांमध्ये इंजेक्शनद्वारे प्रतिपिंडे सोडली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या शरीरात विषाणू सोडला गेला. यानंतर उंदरांचे सहा दिवस निरीक्षण करण्यात आले. प्रतिपिंडे शरीरात सोडलेल्या उंदरांमध्ये विषाणूविरोधात लढण्याची क्षमता अधिक निर्माण झाल्याचे आढळून आले.

    New Drug will impactful against corona

    Related posts

    INDIA Alliance : आज I.N.D.I.A आघाडीची बैठक; पावसाळी अधिवेशनाबाबत चर्चा होईल, TMC-AAP सहभागी होणार नाहीत

    India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार

    Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पहिल्यांदाच ईडीने औपचारिक आरोपी बनवले