• Download App
    दिल्लीमध्ये ध्वनि प्रदूषण केल्यास 1 लाखापर्यंत दंड, वाचा पूर्ण यादी, काय-काय केल्याने होऊ शकतो दंड! । new delhi city dpccs strict on noise pollution, fine of up to 1 lakh

    दिल्लीमध्ये ध्वनी प्रदूषण केल्यास 1 लाखापर्यंत दंड, वाचा पूर्ण यादी, काय-काय केल्याने होऊ शकतो दंड!

    noise pollution : राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आता रात्रीच्या वेळी ध्वनी प्रदूषण महागात पडणार आहे. मग ते कोणत्याहीप्रकारचे का असेना. यामध्ये फटाके, डीजी सेट आणि सर्व प्रकारच्या आवाजांचा समावेश आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने सुधारित दंडांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. त्याअंतर्गत परवानगी नसताना दिल्लीत लाऊडस्पीकर किंवा पब्लिक अॅड्रेसिंग सिस्टिम वाजवल्यास 1 लाखापर्यंत दंड भरावा लागेल. new delhi city dpccs strict on noise pollution, fine of up to 1 lakh


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आता रात्रीच्या वेळी ध्वनी प्रदूषण महागात पडणार आहे. मग ते कोणत्याहीप्रकारचे का असेना. यामध्ये फटाके, डीजी सेट आणि सर्व प्रकारच्या आवाजांचा समावेश आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने सुधारित दंडांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. त्याअंतर्गत परवानगी नसताना दिल्लीत लाऊडस्पीकर किंवा पब्लिक अॅड्रेसिंग सिस्टिम वाजवल्यास 1 लाखापर्यंत दंड भरावा लागेल.

    त्याचबरोबर डीजी सेटच्या आकारमानानुसार 1,000 ते 1 लाख रुपयांच्या आवाजासाठी दंडदेखील भरावा लागेल. एवढेच नव्हे तर कारवाईमध्ये उपकरणे जप्त करण्याचीही तरतूद असेल. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने ध्वनी प्रदूषणासाठी या नवीन दंडांविषयी सर्व संबंधित विभागांना माहिती दिली आहे आणि त्यांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

    विशेष म्हणजे दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने ध्वनी प्रदूषण नियमांच्या उल्लंघनाच्या शिक्षेमध्ये बदल केला आहे. लाउडस्पीकर / पब्लिक अॅड्रेसिंग सिस्टिमद्वारे आवाजासाठी 10,000 रुपये दंड, 1000 केव्हीएपेक्षा जास्त डिझेल जनरेटर सेटसाठी 1 लाख रुपये दंड करण्याची तरतूद आहे.

    ध्वनी प्रदूषणाची सामान्य पातळी सुमारे 55 डेसिबल मानली जाते. अॅपद्वारे प्रदूषण मापन करणारे असे म्हणतात की, शहरातील कोणत्याही गर्दी असलेल्या भागात अॅपद्वारे मोजले जाणारे प्रमाण 80 डेसिबलपेक्षा कमी मिळत नाही.

    नवीन ध्वनी प्रदूषण दंड दराअंतर्गत विहित मानकांपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या कन्स्ट्रक्शन उपकरणांवर 50,000 रुपयांपर्यंत दंड आकारू शकतात. यासह उपकरणेही जप्त केली जातील. नव्या तरतुदीनुसार जर कोणतीही व्यक्ती निवासी किंवा व्यावसायिक भागात फटाके वाजवत असेल तर त्याला 1000 रुपये दंड आकारला जाईल. त्याच वेळी सायलेंट झोनमध्ये जर फटाके वाजवले तर दंड 3000 रुपये असेल. यासह सार्वजनिक रॅली, लग्न समारंभ आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये जर फटाके वापरण्यात येत असतील तर निवासी आणि व्यावसायिक झोनमध्ये 10,000 रुपये आणि सायलेंट झोनमध्ये 30,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.

    • कन्स्ट्रक्शन मशीनरीमुळे होणाऱ्या आवाजावर उपकरणे सील केली जातील, 50,000 रुपये दंडही आकारला जाईल.
    • निवासी आणि व्यावसायिक फटाके वाजवल्यास 1000 रुपये दंड आकारला जाईल.
    • सायलेंट झोनमधील फटाक्यांमुळे 3,000 रुपये दंड आकारला जाईल.
    • सार्वजनिक मेळावे, मिरवणुका, विवाह सोहळे, धार्मिक समारंभ, निवासी आणि व्यावसायिक ठिकाणी 10,000 रुपये दंड आकारला जाईल.
    • सायलेंट झोनमध्ये सार्वजनिक मेळावा, मिरवणूक, विवाह सोहळा, धार्मिक सोहळा 20 हजार रुपये दंड
    • 1000 केव्हीएच्या डीजी सेटवरून आवाजावर उपकरण सील आणि 1 लाख रुपये दंड
    • 62.5 ते 1000 केव्हीएच्या डीजी सेटवर 25 हजार रुपये दंड उपकरणे सील केली जातील
    • डीजीवर 62.5 केव्हीए सेटवर उपकरणे सील आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद.

    new delhi city dpccs strict on noise pollution, fine of up to 1 lakh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य