• Download App
    दिल्लीतील मोजक्या कुटुंबांसाठीच पूर्वी देशात नवी बांधकामे झाली, पंतप्रधानांची नाव न घेता गांधी कुटुंबावर टीका|New constructions in the country for only a few families in Delhi,PM criticizes Gandhi family without naming

    दिल्लीतील मोजक्या कुटुंबांसाठीच पूर्वी देशात नवी बांधकामे झाली, पंतप्रधानांची नाव न घेता गांधी कुटुंबावर टीका

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दिल्लीतील काही मोजक्या कुटुंबांसाठीच नवी बांधकामे केली गेली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेस आणि गांधी कुटुंबावर केली. आपल्या सरकारनेच देशाला सकुंचित मानसिकतेतून बाहेर काढले, असेही ते म्हणाले.New constructions in the country for only a few families in Delhi,PM criticizes Gandhi family without naming

    गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यात प्रसिद्ध सोमनाथ मंदिराजवळील नव्याने बांधलेल्या सर्किट हाऊसचे आॅनलाईन उद्घाटन करताना मोदी बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रीय महत्त्वाच्या नव्या स्मारकांचे बांधकाम केले व त्याचसोबत अस्तित्त्वात असलेल्या स्मारकांचे वैभव वाढवले. धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रांच्या विकासामुळे स्थानिक अर्थव्यवहारांना चालना मिळते.



    मोदी म्हणाले, आपल्या धर्मग्रंथांमध्ये भगवान सोमनाथच्या पूजेमध्ये म्हटले आहे की, भक्तीच्या कृपेने भगवान सोमनाथ अवतरला, कृपेचे भांडार उघडले. ज्या परिस्थितीत सोमनाथ मंदिराचा विध्वंस झाला आणि त्यानंतर ज्या परिस्थितीत सरदार पटेलांच्या प्रयत्नातून मंदिराचा जीर्णोद्धार झाला,

    या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी मोठा संदेश आहेत. कारण आम्ही आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहोत.नवीन सर्किट हाऊस पर्यटनाचे केंद्रबिंदू बनेल असे सांगून पंतप्रधान म्हणाले की त्याचे लँडस्केपिंग अशा प्रकारे केले गेले आहे की प्रत्येक खोलीतून समुद्र दिसेल. जेव्हा लोक येथे त्यांच्या खोल्यांमध्ये शांतपणे बसतील तेव्हा त्यांना समुद्राच्या लाटा आणि शिखर देखील दिसेल. सोमनाथ देखील दिसेल.

    New constructions in the country for only a few families in Delhi,PM criticizes Gandhi family without naming

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य