• Download App
    तमिळनाडूतून ‘नीट’ परीक्षा कायमची बंद, बारावीच्या गुणांवरच मिळणार वैद्यकीय प्रवेश। NEET exam will scrapped in Tamilnadu

    तमिळनाडूतून ‘नीट’ परीक्षा कायमची बंद, बारावीच्या गुणांवरच मिळणार वैद्यकीय प्रवेश

    वृत्तसंस्था

    चेन्नई – तमिळनाडू विधानसभेने नीट परीक्षा कायमची बंद करण्यासंबंधीचे विधेयक एकमताने मंजूर केले. आता नव्या कायद्यानुसार बारावीतील गुणांच्या आधारे ‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळेल. NEET exam will scrapped in Tamilnadu

    वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सुमारे १५ जणांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे. स्टॅलिन यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच ‘नीट’ परीक्षा रद्द करण्याचे आश्वाणसन दिले होते. त्यानुसार सत्तेवर आल्यानंतर हे आश्वा सन पूर्ण करण्याच्यादृष्टीने न्यायाधीश ए.के. राजन आयोग नेमला होता. ‘नीट’चा विपरीत परिणामांचा अभ्यास करून वैद्यकीय अभ्यासक्रमाला जाऊ इच्छिणाऱ्या राज्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचा या परीक्षेबाबत फारसे अनुकूल मत नसल्याची नोंद या आयोगाने अहवाल केली होती.



    सालेम जिल्ह्यातील गरीब घरातील मुलगा धनुष याने आत्महत्या केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ‘नीट’ परीक्षा होणार होती. आधी दोन वेळा परीक्षा देऊनही धनुष यशस्वी झाला नव्हता. तिसऱ्या प्रयत्नातही उत्तीर्ण होणार नसल्याच्या भीतीने त्याने जीवन संपविले. या पार्श्वाभूमीवर मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी यांनी सोमवारी ‘नीट’ परीक्षेविरोधातील विधेयक विधासभेत मांडले. विरोधी अण्णाद्रमुक पक्षानेही त्याला पाठिंबा दिला, पण बारावीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत सभात्याग केला.

    NEET exam will scrapped in Tamilnadu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची