• Download App
    नीरज चोप्राचे ट्विट झाले खरे!!; सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले; नेटिझन्सचा प्रचंड प्रतिसाद!! Neeraj chopra's social media following increases in leaps and bound

    नीरज चोप्राचे ट्विट झाले खरे!!; सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले; नेटिझन्सचा प्रचंड प्रतिसाद!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नीरजला चोप्राने टोकियोत कमाल करून सुवर्ण पदक मिळताच त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोअर्स मिनिटाला दीड ते २ हजाराने वाढत गेलेले दिसत आहेत, तर ट्विटर अकाउंटवरही फॉलोवर्स वाढत गेले आहेत. Neeraj chopra’s social media following increases in leaps and bound

    टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम टप्प्यात नीरज चोप्राने भारतीयांच्या पदरात सुवर्ण पदकाची भर टाकून ऑलिम्पिकमधील भारताची अनेक वर्षांची सुवर्ण पदकाची प्रतीक्षा संपवली. ज्या क्षणी नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावले त्याच क्षणी नीरज चोप्रावर भारतभरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. तसेच नेटिझन्सनीही नीरज चोप्राच्या सोशल मीडियाच्या अकाउंटला उचलून धरले. नीरजला सुवर्ण पदक मिळताच त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोअर्स मिनिटाला दीड  ते २ हजाराने वाढत गेले, तर ट्विटर अकाउंटवरही फॉलोअर्स वाढत गेले.



    – नीरजचे १५ नोव्हेंबर २०१७ रोजीचे ट्विट नेटिझन्सनी उचलून धरलेय!

    नीरजने १५ नोव्हेंबर २०१७ रोजी जे ट्विट केले होते, ते ट्विट आकर्षक वाटले. त्यामध्ये नीरज चोप्राने म्हटले होते की, “जब सफलता की ख्वाहिश आपको सोने ना दे… जब मेहनत के अलावा कुछ अच्छा ना लगे… जब लगातार काम करने के बाद थकावट ना हो… समझ लेना सफलता का नया इतिहास रचने वाला है…!!” हेच ट्विट नेटिझन्सनी उचलून धरले आहे.

    नीराजच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला आहे. कालपर्यंत भारतीयांना विशेष परिचित नसलेला नीरज चोप्रा त्यानंतर काही तासांत कोट्यवधी भारतीयांचा लाडका बनला आहे. नीरजचे २ तासांत ट्विटरवर तब्बल १३ हजार फॉलोअर्स वाढले आहेत.

    Neeraj chopra’s social media following increases in leaps and bound

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची