• Download App
    'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमावरून राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा, म्हणाले- पंतप्रधान मोदी 'परेशानी पे चर्चा' कधी करणार?|NCP targets BJP over 'Pariksha Pay Charcha' program

    ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमावरून राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा, म्हणाले- पंतप्रधान मोदी ‘परेशानी पे चर्चा’ कधी करणार?

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ आयोजित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, परंतु त्याच वेळी त्यांना ‘परेशानी पे चर्चा’ म्हणत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि सामान्य लोकांच्या चिंतांबद्दल बोलण्याचा आग्रह केला आहे.NCP targets BJP over ‘Pariksha Pay Charcha’ program


    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ आयोजित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, परंतु त्याच वेळी त्यांना ‘परेशानी पे चर्चा’ म्हणत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि सामान्य लोकांच्या चिंतांबद्दल बोलण्याचा आग्रह केला आहे.

    एनसीपीचे प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो म्हणाले की, काही सेलिब्रिटींनी लोकांना मोदींचे ‘परीक्षा पे चर्चा’ परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसोबत पाहण्याचे आवाहन केले आहे, परंतु ते पंतप्रधानांना लोकांच्या त्रासावर चर्चा करण्यास कधी सांगतील.



    ते म्हणाले, “परीक्षेच्या काळात विद्यार्थी तणावाखाली असतात. तणावमुक्त करण्यासाठी पंतप्रधानांशी संवाद साधल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, पण विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि सामान्य लोकांच्या चिंता दूर करण्यासाठी ते ‘परेशानी पे चर्चा’ कधी आयोजित करणार आहेत?”

    ते म्हणाले की, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती दररोज वाढत आहेत आणि बेरोजगारी ही “चिंतेची बाब” बनली आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा या सेलिब्रिटींनी कधी विचार केला आहे का, असा सवालही क्रॅस्टो यांनी केला. दरम्यान, ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी परीक्षेचा ताण आणि संबंधित प्रश्नांबद्दल बोलतात. गेल्या चार वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

    NCP targets BJP over ‘Pariksha Pay Charcha’ program

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट