• Download App
    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना IL&FS मनी लॉन्ड्रींगच्या चौकशीसाठी ईडीचे समन्स|NCP state president Jayant Patil ED summons to probe IL&FS money laundering

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना IL&FS मनी लॉन्ड्रींगच्या चौकशीसाठी ईडीचे समन्स

    वृत्तसंस्था

    मुंबई : मागील काही महिन्यांपासून देशातील अनेक बड्या नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करण्यात आली आहे. अशातच पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेत्याला ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आली आहे. NCP state president Jayant Patil ED summons to probe IL&FS money laundering

    जयंत पाटील यांना सोमवार १५ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप होता.



    या प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे सोपवण्यात आले होते.

    यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. जयंत पाटील आता या सगळ्या प्रकाराला कसे सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

    NCP state president Jayant Patil ED summons to probe IL&FS money laundering

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले