• Download App
    राऊत - सुप्रियांच्या नाचानंतर प्रफुल्ल पटेलही मुलगा प्रजयच्या लग्नात "जुम्मे की रात"वर सलमान-शिल्पा शेट्टीसोबत नाचले...!! । NCP leader Praful Patel son wedding feast celebrated in Jaipur Pink City

    राऊत – सुप्रियांच्या नाचानंतर प्रफुल्ल पटेलही मुलगा प्रजयच्या लग्नात “जुम्मे की रात”वर सलमान-शिल्पा शेट्टीसोबत नाचले…!!

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी हिच्या लग्नात त्यांचा आणि सुप्रिया सुळे यांचा “जोडी नाच” अर्थात “कपल डान्स” गाजलेला असतानाच आणखी एक नच बलिये नाच गाजायला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे आपला मुलगा प्रजय याच्या लग्नात सलमान खान आणि शिल्पा शेट्टी बरोबर “जुम्मे की रात”मे या गाण्यावर नाचले आहेत. प्रफुल्ल पटेल यांचा हा नाच सोशल मीडियावर गाजतो आहे. NCP leader Praful Patel son wedding feast celebrated in Jaipur Pink City

    जयपूरमध्ये प्रजयच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी जयपूरच्या रामबाग पॅलेसमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योगपती अनिल अंबानी, गौतम अदानी यांच्यासह इतर उद्योगपती, सलमान खान, शिल्पा शेट्टीसह चित्रपट क्षेत्रातील अभिनेते आणि राजकीय नेते उपस्थित होते. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. मुलाच्या लग्नामिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रुफल पटेल हे सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्यासोबत नाचताना दिसले.



    प्रजय पटेल याचे लग्न मुंबईतील ज्वेलरी व्यावसायिक शिरीष पुंगिलिया यांची मुलगी शिविका हिच्याशी झालं आहे. शिरीष हे मूळचे जयपूरचे असल्याने त्यांनी लग्नाचे कार्यक्रम जयपूरमध्ये आयोजित केले होते. यामध्ये सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार, राजकीय नेते, व्यावसायिक, क्रिकेटर आपल्या कुटुंबासह होते.

    लग्नात कार्यक्रमासाठी उद्योगपती सज्जन जिंदल, अदानी उद्योग समुहाचे गौतम अदानी, अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी, भारती एअरटेलचे सुनील भारती, हिंदुजा समुहाचे श्रीचंद हिंदुजा देखील उपस्थित होते. वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे अनिल अग्रवाल, क्रिकेटर रवी शास्त्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.

    हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, जया बच्चन, प्रफुल पटेल यांचे बंधू अमरिश पटेल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला, डॉ. केतन देसाई, भाजप नेते राजीव प्रताप हे देखील समारंभात सहभागी झाले होते.

    NCP leader Praful Patel son wedding feast celebrated in Jaipur Pink City

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र