Missing Soldier In Naxal Attack : छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षली हल्ला झाल्यानंतर बेपत्ता जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी दुपारी नक्षलवाद्यांनी बेपत्ता जवानाचे चित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. जवानाला परत आणण्यासाठी सुरक्षा दल योग्य ती कारवाई करत आहे. सीआरपीएफच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली. Naxals Release photo of Missing Soldier In Naxal Attack, made a phone call to local journalist
वृत्तसंस्था
विजापूर : छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षली हल्ला झाल्यानंतर बेपत्ता जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी दुपारी नक्षलवाद्यांनी बेपत्ता जवानाचे चित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. जवानाला परत आणण्यासाठी सुरक्षा दल योग्य ती कारवाई करत आहे. सीआरपीएफच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली.
नक्षलवाद्यांनी म्हटलंय की, बेपत्ता जवान त्यांच्या ताब्यात आहे. तो जखमी आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण सरकारने आधी मध्यस्थांची नावे जाहीर करावीत. यानंतरच जवानाची सुटका केली जाईल. तोपर्यंत तो जनताना सरकारच्या सुरक्षेत राहील. बेपत्ता जवानाचा फोटो जाहीर होण्यापूर्वी विजापूरच्या एका पत्रकाराने नक्षलवाद्यांनी त्याला दोन वेळा फोन केल्याचा दावा केला होता. जवान जखमी झाल्याचे नक्षलवाद्यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांत त्याची सुटका होईल असे सांगण्यात येत होते. दरम्यान, विजापूरमध्ये चकमकीनंतर हरवलेल्या कोब्रा कमांडोचा कसून शोध सुरू आहे. याप्रकरणी पोलीस स्थानिक ग्रामस्थांकडे चौकशी करत आहेत. त्याच वेळी सर्व सोर्सेसच्या माध्यमातून जवानाला शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, नक्षलवाद्यांनी पत्र जारी करून सरकारशी चर्चेसाठी संमती दर्शविली आहे.
पत्रकाराला आला नक्षलवाद्यांचा फोन
विजापूरचे एक पत्रकार गणेश मिश्रा यांनी सांगितले की, त्यांना दोनदा नक्षलवाद्यांचा फोन आला. ते म्हणाले की, जवान त्यांच्या ताब्यात आहे. त्याला गोळी लागल्याने तो जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून दोन दिवसांत त्याची सुटका होईल. नक्षलवाद्यांनी जवानांचा फोटो आणि व्हिडिओही लवकरच जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे.
Naxals Release photo of Missing Soldier In Naxal Attack, made a phone call to local journalist
महत्त्वाच्या बातम्या
- दिलासादायक : भारतात तयार होणार रशियाची लस, Sputnik V च्या 10 कोटी डोसची दरवर्षी होणार निर्मिती
- Antilia Case : माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा NIA कार्यालयात, परमबीर सिंग यांचीही झाली चौकशी
- ॲस्ट्राझेनेका लसीमुळे रक्तात गुठळ्यांची भीती, ब्रिटनने लहान मुलांवरील सुरू असलेले परीक्षण रोखले
- Sachin Vaze Case : मुंबई पोलिसांचा गृह विभागाला 5 पानी अहवाल, परमबीर सिंगांवर खळबळजनक आरोप
- स्थानिक लॉकडाऊनचाही देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, RBI गव्हर्नर दास यांनी व्यक्त केली भीती