वृत्तसंस्था
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी गँगवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात एनआयए सोमवारी छापे घातले आहेत. यामध्ये मुंबईतील 20 अड्डयांचा समावेश आहे. हे सर्व छापे दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी गँगचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी संबधित आहेत. याशिवाय अनेक मनी लाँड्रिंग ऑपरेटर्सवरही छापे घातले आहेत. त्यामध्ये नवाब मलिक यांचा साथीदार सोहेल खान खांडवानी यांचे घर आणि ऑफिस येथे देखील एनआयएच्या टीमने छापे घातले आहेत. Nawab Malik’s accomplice Sohail Khandwani along with 20 bases of Bait Dawood Gang
दाऊद इब्राहिम ची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रिंग केल्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक केली होती. एनआयए या पुढची कारवाई करत नवाब मलिक यांचा साथीदार सोहेल खांडवानी याच्या घरावर आणि ऑफिसवर छापा घातला आहे. या सर्व छाप्या मध्ये नेमके कोणते घबाड सापडते याचे तपशील बाहेर यायचे आहेत.
मुंबईतील या 20 अड्ड्यांवर छापेमारी
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळ येथील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एनआयएने दाऊद इब्राहिम, डी गँगविरोधात गुन्हा दाखल केला होता., त्यासंदर्भात ही चौकशी आणि छापेमारी सुरू आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये एनआयएकडे सोपवला होता. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ही देशातील सर्वात मोठी दहशतवाद विरोधी तपास संस्था आहे. यापूर्वी ईडी दाऊदशी संबंधित प्रकरणांची चौकशी करत होती.
दाऊदची डी गँग टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्स स्मगलिंग आणि फेक करन्सी (एफआयसीएन) मध्ये व्यापार करून भारतात दहशत पसरवण्याचे काम करत आहेत. इतकेच नाही डी गँग लष्कर-ए-तैयबा जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदाच्या माध्यमातून भारतात दहशतवादी कारवाया करत आहेत.
छोटा शकीलसह अनेकांचा समावेश
एनआयए केवळ दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी गँगच्या दहशतवादी कारवायांचा तपास करणार नाही तर अंडरवर्ल्ड डॉनचे गुंड छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची (मृत), दाऊदची बहीण हसीना पारकर (मृत) यांच्याशी संबंधित दहशतवादी कारवायांचाही तपास करणार आहे. सध्या दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये लपून बसला असून कराचीच्या पॉश भागात आपले लपण्याचे ठिकाण बदलत असल्याचे सांगितले जात आहे.
Nawab Malik’s accomplice Sohail Khandwani along with 20 bases of Bait Dawood Gang
महत्वाच्या बातम्या
- “असानी”चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर; 10 मे रात्री आंध्र – ओडिशा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता!!
- राहूल गांधी यांनीच मान्य केले कॉंग्रेसच्या काळात गॅस सिलेंडर आतापेक्षाही होते महाग, करदात्यांचा पैसा उडवून दिले जात होते अनुदान
- पंजाबच्या जनतेच्या पैशावर आपचा गुजरातमध्ये प्रचार, भगवंत मान यांचा विमान दौरा सरकारला पडला ४५ लाख रुपयांना